आदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'

आदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'

मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश यात्रे'ची सुरुवात 1 ऑगस्टला तुकडोजी महाराजांच्या भूमीतून म्हणजे अमरावतीत जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरी येथून होणार आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 21 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीकरता अवघं राज्य पिंजून काढणार आहेत. आचारसंहिता लागण्याच्या आधी ते 'महाजनादेश यात्रे'च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बहुतांश मतदारसंघात जाणार असून सरकारची कामं जनतेसमोर ठेवणार आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सुद्धा सध्या महाराष्ट्राच्या यात्रेवर असून 'जन आशीर्वाद' यात्रेच्या माध्यमातून ते लोकांशी संवाद साधत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश यात्रे'ची सुरुवात  1 ऑगस्टला तुकडोजी महाराजांच्या भूमीतून म्हणजे अमरावतीत जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरी येथून होणार आहे. तर समारोप नाशिक इथे 31ऑगस्टला होणार आहे. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाच्या दिवशी या यात्रेचा प्रारंभ होणार आहे. ही यात्रा 25 दिवस, मुंबई वगळता 30 जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. यात 152 मतदार संघांचा समावेश असणार असून 300 पेक्षा जास्त सभा यात मुख्यमंत्री घेणार आहेत. यात 104 जाहीर सभा, 228 स्वागत सभा आणि 20 पत्रकार परिषदा घेतल्या जाणार आहेत.

राष्ट्रवादीचे मंगलदास बांदल, दिलीप मोहिते, हे मुळातच गुंड प्रवृत्तीचे-आढळराव

दुसरा टप्पा नगर येथील अकोले ते नाशिक असा असणार आहे. यात एलईडीवरुन सरकारनं केलेल्या कामांची माहिती लोकांना दिली जाईल. कोणत्याही जिल्हयात ऐनवेळी कोणतेही पक्ष प्रवेश केले जाणार नाहीत. तसंच या यात्रे दरम्यान प्रदेश कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणाचेही प्रवेश केले जाणार नाहीत असंही पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आलं

आदित्य हे प्रशांत किशोर यांचं प्रॉडक्ट

आदित्य ठाकरे हे प्रशांत किशोरांच प्रॉडक्ट असून शिवसेनेवर कन्सलटंसी लाऊन राजकारण करायची वेळ आली आहे, अशी खोचक टीका करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जनआशीर्वाद यात्रेवरून समाचार घेतला. शिवसेनेचा मोर्चा हा फेससेव्हिंग आहे. आम्ही आंदोलन करणार आहोत. सरकारच्या विरोधात वातावरण पेटवणार आहोत. आम्ही काम करतोय ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्याकडे आयटी यंत्रणा नाही. तेवढी आमची ताकद नाही. तेवढा पैसे आमच्याकडे नाही, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.जयंत पाटील पुण्यात बोलत होते.

VIDEO: 'स्वबळावर निवडणूक लढवूनही 170 जागा येतील'

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी रविवारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यात महाराष्ट्रातल्या 288 जागांच्या स्थितीची तपशीलवार चर्चा करण्यात आली. मागवलेल्या अर्जांवर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. 288 जांगासाठी साधारण 780 अर्ज आले आहेत. कॉंग्रेससोबत चर्चा करून अंतिम टप्प्यात उमेदवार ठरवण्यात येणार आहे. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेसह भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले.

VIDEO: मुंबईतील चर्चिल चेंबरमधील आगीवर नियंत्रण, परिसरात धुराचे लोट

आमचे आमदार मुख्यमंत्र्यांना कामासाठी भेटायला जातात. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्तयांना भाजप विसरले आहे. विरोधक मजबूत नसतील तर मग त्यांचे आमदार का पळवले जात आहेत, असा सवाल यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला. शिवसेना-भाजप युतीत मुख्यमंत्रिपदावरून कलगातुरा सुरू आहे. शिवसेनेला भाजपच नेतृत्त्व मान्य नाही, हे सांगत भाजप सेनेचे नेते आमच्याही संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 06:26 PM IST

ताज्या बातम्या