Elec-widget

काँग्रेसचे कच्चे-बच्चे सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागतात, मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका

काँग्रेसचे कच्चे-बच्चे सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागतात, मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका

सैन्याकडे पुरावा मागणाऱ्यांनी पाण्यात बुडून आत्महत्या केली पाहिजे.

  • Share this:

कोल्हापूर, 24 मार्च : महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराला आज सुरुवात झाली आहे. कोल्हापूरात शिवसेना आणि भाजप युतीच्या पहिल्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर टीका करत जोरदरा घोषणाबाजी केली आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही सडकून टीका केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- मुंबईत अरबी महासारग आहे आणि कोल्हापूरात महा जनसागर आहे. कोल्हापूर आमचं शक्तिपीठ आहे.

- आमची युती झाली पण आठवले यांचं काय झालं हे त्यांनाच माहित नाही.

- 56 पक्ष एकत्र आले असं आठवले म्हणतात. पण 56 पक्ष रजिस्टर तरी आहेत का?

Loading...

- देश चालण्याकरता 56 पक्ष लागत नाही. तर

56 इंचाची छाती लागते.

- पक्षाच्या कॅप्टनचीच माढ्यातून माघार

- स्वातंत्र्यापासून देशाची नाही तर काँग्रेसच्या नेत्यांची गरीबी हटली

- पहिल्यांदा मोदींच्या नेतृत्वाखाली गरीबांचे दिवस बदललं.

- काँग्रेस-राष्ट्रवादीला माझं खुलं आव्हान आहे. तुमचं 15 वर्षांचे आकडे घेऊन या आणि आमचे 5 वर्षांचे आकडे पाहा.

- ना पश्चिम महाराष्ट्र ना विदर्भ, पैसा तर यांच्या तिजोऱ्यांमध्ये गेला

- काहीजण पोपट नेमत आहेत

- आमचे कपडे कुणी उतरू शकत नाही

- तुमची शिल्लक लंगोट पण उद्धव यांनी उतरवली

- दुपारी निवांत घरी शांत रहा, मोदी सूर्यासारखे आहेत. त्याच्याकडे बघून थुंकले तरी ती आपल्यावर येते.

- काँग्रेसचे कच्चे-बच्चे सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागतात

- सैन्याकडे पुरावा मागणाऱ्यांनी पाण्यात बुडून आत्महत्या केली पाहिजे.

VIDEO: पार्थ पवारांचा अनोखा अंदाज; गाण्यावर धरला ठेका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 09:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...