News18 Lokmat

मुख्यमंत्री फडणवीस परदेश दौऱ्यावर, राज्याची जबाबदारी या तीन मंत्र्यांवर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दहा दिवस परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही चीनच्या दौऱ्यावर आहेत.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2018 07:59 AM IST

मुख्यमंत्री फडणवीस परदेश दौऱ्यावर, राज्याची जबाबदारी या तीन मंत्र्यांवर

मुंबई, 11 जून : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दहा दिवस परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही चीनच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राज्याची जबाबदारी आता तीन मंत्र्यांवर देण्यात आली आहे. त्यामध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त राज्यात महिलांसाठी स्वच्छतागृह उभा करण्याचा संकल्प केलाय आणि त्यांच्या वाढदिवसादिवशी त्यांना प्रभारी मुख्यमंत्रीपद मिळाल्याची चर्चा आज राज्यभर होती त्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, शनिवारपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिका आणि कॅनडाच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात ते वॉशिंग्टन, सेन फ्रांसिस्कोमध्ये अनेक शहारांना भेट देऊन तेथील प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, 'अॅमेझॉन' समुहातर्फे मुख्यमंत्र्याचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

हेही वाचा...

न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, मी निर्दोष सुटणार- छगन भुजबळ

Loading...

सिंहासनाच्या रक्षणासाठी हातात तलवारी असायला हव्यात - संभाजी भिडे

... तर पंतप्रधानपदासाठी संघ प्रणव मुखर्जींचं नाव पुढे करेल - संजय राऊत

शिशिर शिंदे यांची घरवापसी, 19 जूनला करणार शिवसेनेत प्रवेश

UPSC परीक्षा न देता बनता येणार IAS अधिकारी, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2018 07:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...