हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है - मुख्यमंत्री

सबका मालीक एक है, श्रद्धा आणि सबुरी. त्यावरच आमची वाटचाल सुरू आहे. सगळ्यांनाच आमदार व्हायचं आहे. मात्र थोडी सबुरी ठेवा असंही त्यांनी पुन्हा सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 08:13 PM IST

हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है - मुख्यमंत्री

हरीश दिमोटे, शिर्डी 31 जुलै : राज्यात घडत असलेल्या मोठ्या राजकीय घडामोडी आणि भाजपची 'मेगाभरती' या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शिर्डीत होते. निमित्त होतं राज्यव्यापी सरपंच परिषदेचं. सर्व राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे सरपंच आणि आगामी विधानसभा निवडणुका यामुळे या परिषदेत मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यात आली होती, त्यावर बोलताना  मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनाच सूचक इशारा दिला. ते म्हणाले, हा तर फक्त ट्रेलर आहे ...पिक्चर अभी बाकी है. सरपंच परिषदेत मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य असलं तरी त्यांचा इशारा हा यापुढेही अनेक मोठ्या घडामोडी घडतील असाच होतो असं बोललं जातंय.

VIDEO : ममतादीदींची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री म्हणाले, पुन्हा आमचेच सरकार येणार असून राहिलेल्या समस्या नव्या सरकारमध्ये सोडवणार आहे. अनेकांना आमदार व्हायचंय मात्र थोडी सबूरी ठेवा असा सल्लाही त्यांनी सगळे नेते आणि कार्यकर्त्यांना दिला. शिर्डीत आज राज्यातल्या 47 हजार सरपंच आणी उपसरपंचाची परिषद पार पडलीय. या परीषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे,  पालकमंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सगळे खासदार आणि आमदार उपस्थित होते.

साथ लढेंगे! EVMविरुद्धच्या मोर्च्यात राज ठाकरेंचं 'दीदीं'ना मुंबई येण्याचं आवतन

Loading...

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक असून राज्यातील सर्व सरपंच एकत्र आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासासाठी शिर्डीत विचार मंथन झाले असून शिर्डीची तीन वैशिष्ट्य आहेत. सबका मालीक एक है, श्रद्धा आणि सबुरी. त्यावरच आमची वाटचाल सुरू आहे. सगळ्यांनाच आमदार व्हायचं आहे. मात्र थोडी सबुरी ठेवा असंही त्यांनी पुन्हा सांगितलं.

VIDEO : आणखी आमदार संपर्कात, पण गिरीश महाजनांनी व्यक्त केली ही शंका

राज्यातील जलशीवारच्या कामामुळे दुष्काळावरही मात झाली आहे. जलशीवारमुळे गावा गावांना शाश्वत पाणी मिळाले असून महाराष्ट्रातील सरपंचांनी आज अनेक गावं आदर्श केलीय. जुन्या काळात सरपंच म्हटलं की निळू फुलेच दिसायचे. आता मात्र सुशिक्षित तरूण आणि महिला राज्यात सक्षमपणे काम करत आहे ही समाधानाची गोष्ट आहे असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2019 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...