गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 25 किमी करावा लागला कारने प्रवास

पण गडचिरोलीसारख्या संवेदनशील भागात मुख्यमंत्र्यांचं चॉपर बंद पडतंच कसं, हा खरा सवाल आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 12, 2017 07:56 PM IST

गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 25 किमी करावा लागला कारने प्रवास

12 मे : गडचिरोलीतल्या दुर्गम अहेरीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे नागपूरपर्यंत मुख्यमंतत्र्यांना कारमधून यावं लागलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षावस्थेत गंभीर बाब समोर आलीये.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज गडचिरोलीतल्या दूरगम अशा अहेरी भागात बिघाड झाला. शेवटी अहेरी ते नागपूर असा प्रवास त्यांना कारनं करावा लागला. प्रश्न प्रवास कारनं करावा लागला हा नाही. पण गडचिरोलीसारख्या संवेदनशील भागात मुख्यमंत्र्यांचं चॉपर बंद पडतंच कसं, हा खरा सवाल आहे.

काही दिवसांपूर्वीच शेजारच्या छत्तीसगडमध्ये 25 जवान शहीद झाले होते. असाच हल्ला मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर झाला तर काय ओढवेल, याची कल्पना सामान्य प्रशासन विभागाला आहे का ?, हा मूळ मुद्दा आहे.

अहेरी ते नागपूर हा 258 किलोमीटरचा प्रवास आहे. इतकं अंतर सहसा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बाय रोड कधीच जात नाहीत. अशी घटना परत होऊ नये म्हणजे मिळवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 07:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...