'...तर तटकरे किस खेत की मूली' म्हणत मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

'...तर तटकरे किस खेत की मूली' म्हणत मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

तटकरेंनी जे काही रायगडमध्ये केलं ते अनंत गिते करू शकणार नाहीत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

  • Share this:

मोहन जाधव, प्रतिनिधी

रायगड, 18 एप्रिल : रायगड मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला.

तटकरेंनी जे काही रायगडमध्ये केलं ते अनंत गिते करू शकणार नाहीत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. रायगडमध्ये सुनील तटकरेंनी भ्रष्टाचार केला, पैसा कमावला, कंपन्या उभारल्या असं काहीही अनंत गिते करू शकणार नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

पवारांवरून सुनील तटकरेंना केलं लक्ष

'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेच्या माढा मतदारसंघातून माघार घेतली. त्यामुळे जर कॅप्टनच मागे होत असेल तर तटकरी किस झाड की मूली है' असं शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली.

VIDEO: मोदींच्या 'कास्ट कार्ड'वर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

चुरशीची लढत : सुनील तटकरेंनीच सुनील तटकरेंना हरवलं होतं; इथे यंदाही रंगणार नावांचा खेळ?

नावात काय आहे, असं शेक्सपिअर म्हणाला असला, तरी नामसाधर्म्यामुळेच मतांचं गणित बदललं आणि थेट केंद्रीय मंत्रिपदाची वाट मोकळी झाली. हे घडलं मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि अनंत गीते यांच्या बाबतीत.

2014 ची निवडणूक रायगड लोकसभा मतदारसंघात अगदी चुरशीची झाली होती. मतमोजणीच्या दिवशी अगदी एकेका क्षणाला कल बदलत होते. शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात अटीतटीची लढत सुरू होती. शेवटी अनंत गीते निवडून आले अवघ्या 2110 मतांनी. दुसऱ्या दिवशी सविस्तर आकडेवारी जाहीर झाली, त्या वेळी पुढे आलं की, एका सुनील तटकरे नावाच्या अपक्ष उमेदवाराला मिळाली होती 9849 मतं. म्हणजे या अपक्ष सुनील तटकरेंनीच अनंत गीतेंचा विजय सुकर केला होता.

तुल्यबळ प्रतिस्पर्धी असेल तर बोगस उमेदवार उभं करण्याची पद्धत काही नवी नाही. पण थेट केंद्रीय मंत्रिपदाचा मार्ग या अशा नामसाधर्म्याने मिळण्याची गोष्ट विरळा असेल.

विशेष म्हणजे या वर्षी युती आणि आघाडी दोघांकडूनही असे बोगस उमेदवार उभे करण्याचा फंडा याच मतदारसंघात करण्यात आला. रायगड मतदारसंघात आतापर्यंत शिवसेनेच्या अनंत गीते आणि राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्याव्यतिरीक्त 2 सुनील तटकरे आणि 1 अनंत गीते अपक्ष म्हणून उभे आहेत. यातल्या अनंत गीते यांचा अर्ज अवैध ठरणार असल्याची बातमी सामना या दैनिकात प्रसिद्ध झाली आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मतदारसंघातलं खरं चित्र स्पष्ट होईल.

रायगड मतदारसंघ 2014चा निकाल

अनंत गीते (शिवसेना) 396178

सुनील दत्तात्रय तटकरे (राष्ट्रवादी) 394068

सुनील तटकरे (अपक्ष) 9849


भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारल्याने खळबळ, VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 03:22 PM IST

ताज्या बातम्या