उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अभ्यास करणार - मुख्यमंत्री

यूपी सरकारनं कर्जमाफीचं गणित नेमकं कसं जुळवलं, याचा अभ्यास केला जाईल,' असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2017 03:38 PM IST

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अभ्यास करणार - मुख्यमंत्री

05 एप्रिल :  उत्तर प्रदेश सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यामुळं महाराष्ट्र सरकारवर दबाव आता चांगलाच वाढला आहे. 'यूपी सरकारनं कर्जमाफीचं गणित नेमकं कसं जुळवलं, याचा अभ्यास केला जाईल,' असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं.

वाढत्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी विरोधकांकडून सुरू आहे. सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनंही या मुद्द्यावर विरोधकांना पाठिंबा दिला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच संघर्ष यात्रा काढून विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता. संघर्ष यात्रा संपल्यावरही विरोधक आज अधिवेशनात कर्जमाफीच्या मुद्दयावरून चांगलेच आक्रमक दिसले. जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरु ठेवण्याचा निर्धार विरोधकांनी ठाम आहे.

त्यातच यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारनं काल तिथल्या शेतकऱ्यांचं एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली. त्यावर, जर आदित्यनाथ सरकार शेकतकऱ्यांचं कर्जमाफ करू शकते तर, मग देवेंद्र सरकार का नाही, असा प्रश्न उपस्थित करुन विरोधकांनी सरकारवर आणखीन दबाव पाडण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन दिले.

'राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही देत, यूपीतील कर्जमाफीच्या मॉडेलचा अभ्यास करण्याचे आदेश राज्याच्या वित्त सचिवांना दिल्याची माहिती फडणवीस यांनी आज दिली. 'यूपी सरकारनं हा निर्णय कसा घेतला, यासाठी पैसे कुठून आणणार याचा अभ्यास केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

कर्जमाफीसाठी माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. कर्जमाफी करायची की नाही हा सरकारचा निर्णय आहे. यासाठी आम्हाला हायकोर्टाच्या आदेशाची गरज नाही.  राज्य सरकार सक्षम आहे, असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं. आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. केंद्र सरकारनं मदत न दिल्यास आर्थिक नियोजन कसं करायचं याचाही अभ्यास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 02:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...