S M L

मुनगंटीवार काय स्वत: 'अवनी'ला गोळ्या घालायला गेले नव्हते - मुख्यमंत्री

राज्य सरकारच्या आदेशानंतर अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावर मोठं वादंग तयार झालं. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Updated On: Nov 6, 2018 04:23 PM IST

मुनगंटीवार काय स्वत: 'अवनी'ला गोळ्या घालायला गेले नव्हते - मुख्यमंत्री

उस्मानाबाद, 6 नोव्हेंबर - अवनी वाघीण मृत्यू प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांचा राजीनामा मागणं चुकीचं आहे. ते स्वतः बंदूक घेऊन वाघिणीला मारायला गेले नव्हते,’ असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे.

राज्य सरकारच्या आदेशानंतर अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावर मोठं वादंग तयार झालं. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी आपण मनेका गांधी यांच्याशी बोलणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

‘दुष्काळाबाबत केंद्राकडे मागितली मदत’

दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे सात हजार कोटींची मदत मागितली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  केंद्राकडे जी मदत मागायची आहे त्याचा आराखडा जवळपास पूर्ण झाला आहे. कृष्णा-मराठवाडा प्रकल्पासाठीही नाबार्डकडे 2200 कोटी मागितले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

काय आहे अवनी वाघीण प्रकरण?

Loading...

चंद्रपुरातील अवनी ही वाघीण नरभक्षक आहे, असं सांगून या वाघिणीला राज्य सरकारच्या आदेशानंतर ठार केल्यावर भाजप नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनीही संताप व्यक्त केला. ‘या प्रकरणी मी राजकीय आणि कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे,’ असंही मनेका गांधी यांनी ट्विट करत म्हटलं.

‘वाघिणीची हत्या केल्याने मी खूप दु:खी झाली आहे. चंद्रपुरात शहाफत अली खान यानं आतापर्यंत 3 वाघ, 10 बिबट्या, अनेक हत्ती आणि जवळपास 300 रानडुकरांची हत्या केली आहे. अशा माणसाला तुम्ही अमानवी कृत्य करण्यासाठी कसं काय नेमू शकता,’ असा सवाल राज्य सरकारला विचारत मनेका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला.

या क्रूर हत्येने दोन बछड्यांना अनाथ केलं आहे, असं म्हणत त्यांनी या प्रकरणाची भीषणता अधोरेखित केली. मनेका गांधी यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत भाजपला घरचा आहेर दिला होता.

मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर

कुपोषित बालकांच्या मृत्यूप्रकरणी आधी केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी राजीनामा द्यावा आणि मग माझ्या राजीनाम्याची मागणी करावी, असं म्हणत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला .

चंद्रपुरातील अवनी वाघिणीला नरभक्षक असल्याचं कारण देऊन ठार केल्याने राज्य सरकार आणि नवमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मनेका गांधींनी लक्ष्य केलं होतं. तसंच मनेका गांधींनी याप्रकरणी मुनगंटीवारांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. त्याला आता सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलंय.यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी 'नेटवर्क18' सोबत एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली आहे.

‘मनेका गांधी या केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री आहेत. अलिकडच्या काळात कुपोषणामुळे लहान बालकांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याची जबाबदारी स्वीकारत मनेका गांधींनी आधी स्वत:चा राजीनामा दिला पाहिजे आणि नंतर माझ्या राजीनाम्याची मागणी करावी,’ असं मुनगंटीवार म्हणाले.

पंतप्रधान हे मनेका गांधींच्या राजीनाम्याचा निर्णय घेतील, तसं माझ्या राजीनाम्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घेतील, असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी मनेका गांधींना टोला लगावला.


VIDEO : बापरे...किती मोठा वाघ! यवतमाळमध्ये पट्टेदार वाघाचं पुन्हा 'असं' दर्शन




 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2018 04:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close