ऊस पेरायचा असतो की लावायचा असतो ?,अजितदादांनी केली मुख्यमंत्र्यांची मिमिक्री

ऊस पेरायचा असतो की लावायचा असतो ?,अजितदादांनी केली मुख्यमंत्र्यांची मिमिक्री

देवेंद्र फडणवीस सारखं सांगता 5 पिढ्यांचा शेतीशी संबंध आहे. पण पाच पिढ्या संबंध म्हणजे नुसती शेती पाहिले असा होतो का ?

  • Share this:

28 एप्रिल : देवेंद्र फडणवीस सारखं सांगता 5 पिढ्यांचा शेतीशी संबंध आहे. पण पाच पिढ्यांचा संबंध म्हणजे नुसती शेती पाहिले असा होतो का ?  शेती कसायची असते, बियाणं कशाला म्हणता बेणं कशाला म्हणता याचं तरी सांगा असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री करून चांगलीच खिल्ली उडवली. तसंच ऊस पेरायचा असतो की ऊस लावायचा असतो हे तरी सांगा असा चिमटाही काढला.

अजित पवार तिखट, स्पष्ट आणि कधीकधी एकदम फटकळ बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण ते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस एका कसलेल्या राजकारण्याची प्रचितीही देतात. सध्या विरोधी पक्षांची जी संघर्ष यात्रा सुरू आहे ती कराडमध्ये असताना अजित पवारांनी तुरीवर चंद्रकांत पाटील, गिरीष बापट आणि देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.

तुरीच्या बाबतीत चंद्रकांत पाटील म्हणतात आकडेवारी काढणं सुरू आहे. आता कशाची आकडेवारी चालू आहे. काय मटक्याची आकडेवारी सुरू आहे. असा टोलाच अजितदादांनी लगावला.

आम्ही समजस घेतोय समजून सांगतोय. आता पान्हा फुटेल उद्या पान्हा फुटेल...पण पाणी लावून लावून ओलं झालं. पण पान्हा काही फुटेना...आता मशीन लावायचंय का ?, आता चंद्रकांतदादा पाटील यांचा काही शेतीशी संबंध आहे का ? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थिती केला.

त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे वळवला. देवेंद्र फडणवीस सारखं सांगता 5 पिढ्यांचा शेतीशी संबंध आहे. पण पाच पिढ्या संबंध म्हणजे नुसती शेती पाहिले असा होतो का ? शेती करायची, शेती कसायची असते. बियाणं कशाला म्हणता, बेणं कशाला म्हणता याचं तरी सांगा.बरं ऊस पेरायचा असतो की ऊस लावायचा असतो ते तरी सांगा असं सांगताना अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करून खिल्ली उडवली.

त्यानंतर तिसरा नंबर लागला तो  गिरीश बापटांचा. गिरीश बापट सुद्धा म्हणता दादा मी फार मोठा शेतकरी आहे. पण बापट तू कधी शेतकरी झाला ? आता अमरावतीला जात असतात. आता कुळाची शेती असले तर कुळ करत असेल ते विदर्भातील लोकांनाच माहिती असेल असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 06:27 PM IST

ताज्या बातम्या