खुल्या प्रवर्गासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 08:57 PM IST

खुल्या प्रवर्गासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत

मुंबई, 6 जून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली. एसईबीसी आणि आर्थिक कमकुवत घटकांना आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचीही मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत भेट घेतली.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना राज्य सरकारच्या वतीने एक विनंतीपत्र देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सादर केले. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शाखेच्या 813 जागा तर पदवी शाखांमध्ये 1740 जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीवर सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. हर्ष वर्धन यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिले.

दुष्काळी उपाययोजनांची दिली माहिती

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. विविध विषयांवर यावेळी चर्चा करतानाच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेली दुष्काळ निवारणासाठीची मदत आणि राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजना इत्यादींची माहिती यावेळी त्यांना दिली. केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांचीही भेट घेत देशाचे संरक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.


Loading...

VIDEO : प्रकाश मेहता प्रकरणी धनंजय मुंडेंचं फडणवीसांवर टीकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 08:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...