S M L

आता जनावरांचं बाळंतपण करणार फडणवीस सरकार

आता जनावरांच्या शस्त्रक्रियांपासून ते बाळांतपणापर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Updated On: Feb 12, 2019 02:35 PM IST

आता जनावरांचं बाळंतपण करणार फडणवीस सरकार

मुंबई, 12 फेब्रुवारी : पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याअंतर्गत आता जनावरांच्या शस्त्रक्रियांपासून ते बाळांतपणापर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्यभरात 349 फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात दुर्गम भागात 80 चिकित्सालये स्थापणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपत्कालीन निधीतून 2 हजार कोटी रूपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. 28 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.

केंद्रातील मोदी सरकारनंतर राज्यातील फडणवीस सरकारनं देखील निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याची बातमी 'न्यूज18 लोकमत'नं दिली होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.

Loading...


VIDEO : मिसेस मुख्यंमत्री जेव्हा बैलगाडीतून मंचावर येतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 02:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close