शपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. शपथविधीचा पहिला मान राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 12:01 PM IST

शपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी

मुंबई, 16 जून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा आज (रविवारी) विस्तार करण्यात केला. या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या 13 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. 13 जणांमध्ये आठ जण कॅबिनेट मंत्री असतील तर पाच जण राज्यमंत्री असतील.

शपथविधीचा पहिला मान राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला आहे. त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. दुसरा क्रमांकावर शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तिसरी क्रमांकावर आशिष शेलार यांनी शपथ घेतली. नवीन सदस्यांचा शपथविधी समारंभ राजभवनाच्या प्रांगणात झाला.

दुसरीकडे प्रकाश मेहतांसह या मंत्र्यांची राजीनामे..

प्रकाश मेहतांसह राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अमरिष अत्राम यांनी त्यांच्या मंत्रिपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्विकारले आहेत.

'आवाज कोणाचा शिवसेनेचा'

Loading...

जयदत्त क्षीरसागर शपथ घेताना 'आवाज कोणाचा शिवसेनेचा' अशी घोषणाबाजी करण्यात आली. जयदत्त क्षीरसागर त्यांचे कुटूंबीय आणि समर्थक मोठ्या संख्येने आले आहेत.  यानंतर शेलारांच्या वेळीही 'भाजप जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, विखे पाटील यांना सार्वजनिक बांधकाम, आशिष शेलार यांना गृहनिर्माण, अनिल बोंडे यांना कृषी, डॉ. संजय कुटे यांना समाज कल्याण, सुरेश खडे यांना आदिवासी विकास, अशोक उईके यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी दिली जाणार आहे.

असा आहे नवा फॉर्म्युला..

मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा फॉर्म्युला 1021 असा आहे. भाजपला 10, शिवसेनेला 2 तर रिपाइंला एक अशी मंत्रिपदे देण्यात आली आहेत. रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर, शिवसेनेकडून नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद देण्यात आले आहे.

या नेत्यांची मंत्रिपदी लागली वर्णी..

कॅबिनेट मंत्री

-राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)

-जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)

-आशिष शेलार (भाजप)

-संजय कुटे (भाजप)

-सुरेश खाडे (भाजप)

-अनिल बोंडे (भाजप)

-तानाजी सावंत (शिवसेना)

-अशोक उईके (भाजप)

राज्यमंत्री

-योगेश सागर (भाजप)

-अविनाश महातेकर (रिपाइं-आठवले गट)

-संजय (बाळा) भेगडे (भाजप)

-परिणय रमेश फुके (भाजप)

-अतुल सावे – भाजप

रिपाइं नेत्याला गेटवर अडवले..

रिपाइं नेते अविनाश महातेकर हे मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पोहोचले तेव्हा महातेकर यांना गेटवर पोलिसांनी अडवले. ते मंत्रिपदाची शपथ घ्यायला आले असल्याचे प्रेस फोटोग्राफरने सांगितल्यानंतर पोलिसांनी महातेकर यांनी आत सोडले. सामाजिक न्याय खात्यात काम करायला आवडेल, असेही महातेकर यांनी सांगितले आहे. यावेळी पत्नी वृषाली महातेकर यावेळी उपस्थित होत्या.

दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदारांना घेऊन आज अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे काही खासदार शनिवारीच (15 जून) रात्री उशिरा अयोध्येत दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबीयदेखील पहाटेच मुंबईहून अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ठाकरे कुटुंबीय अयोध्येत पोहोचतील, अशी माहिती आहे. यानंतर सकाळी 11 वाजण्याच्या उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील. लोकसभा निवडणूक 2019मध्ये विजयी झालेल्या सर्व खासदारांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.


राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 12:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...