उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. देशभर उद्धव यांचा हा दौरा चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 25, 2018 10:34 AM IST

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

सातारा, 25 नोव्हेंबर : 'उद्धव ठाकरे अयोध्येला गेले, याचा आम्हाला आनंदच आहे,' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कराडमधील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

'उद्धव अयोध्येला गेले याचा आम्हाला आनंदच आहे. राम मंदिर हा कोणाच्याही राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर व्हावे ही समाजाची मागणी आहे,' असंही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. देशभर उद्धव यांचा हा दौरा चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज ३४ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त कराड येथील प्रितीसंगमावर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेदेखील उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या निर्मितीत यशवंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचा पायाही यशवंतराव यांनीच रचला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Loading...


...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2018 10:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...