PHOTO: अमृता फडणवीस, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी असा साजरा केला गुढीपाडवा

राजकीय नेत्यांच्या निवासस्थानी गुढीपाडव्याचा उत्साह

News18 Lokmat | Updated On: Apr 6, 2019 06:23 PM IST

PHOTO: अमृता फडणवीस, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी असा साजरा केला गुढीपाडवा

महाराष्ट्रात घरोघरी मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा होतो आहे. राजकीय नेतेमंडळींच्या घरीही गुढीपाडव्याचा उत्साह, आनंद पाहायला मिळाला आहे.

गुढीपाडव्याचा उत्साह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरही पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब गुढी उभी करून गुढीची पुजा केली.

महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रगतीसाठी त्यांनी मनोमन प्रार्थना केली. आगामी निवडणुकीसाठी हे वर्ष लाभदायी ठरावी यासाठी निश्चयही केला आहे.

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांच्या मुलीनं या सणाचा आनंद लुटला. नव्या वर्षाचा नवा संकल्प 'वर्षा'वर गुढी उभी करून केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्याही घरी गुढीपाडवा मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे आणि त्यांचा गुढीसोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे.

माध्यमांसमोर सदानंद सुळे तसे फार कमी येतात मात्र गुढीपाडव्याच्या निमित्तानं सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांचा फोटो फेसबुकवरही लोकप्रिय झालेला पाहायला मिळाला.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नववर्षात वेगवेगळे संकल्प राजकीय नेत्यांनी केले आहेत. मात्र या नववर्षात गुलाल कोण उधळणार आणि निवडणुकीच्या रिंगणात कोणाला धूळ चारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही सहकुटुंब गुढी उभी करून गुढीपाडवा सणाचा आनंद द्विगुणीत केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2019 06:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...