News18 Lokmat

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन; मुख्यमंत्र्यांनी केलं शहिदांना अभिवादन

औरंगाबादेत आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली दिली.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2017 11:41 AM IST

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन; मुख्यमंत्र्यांनी केलं शहिदांना अभिवादन

औरंगाबाद,17सप्टेंबर: आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. याचदिवशी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला आणि भारतात सामील झाला होता. यानिमित्त आज  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहिद स्तंभाला अभिवादन करण्यात आलं.

औरंगाबादेत आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली दिली. यावेळी पालकमंत्री रामदास कदम खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.

'निजामाच्या रजाकारांच्या जुलमाला न जूमानता 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीमधून मुक्त केला. त्यासाठी मोठा लढा उभा केला गेला. त्यामुळेच मराठवाडा भारतात सामील होवू शकला' असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

या कार्यक्रमानंतर त्यांनी काही स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबाची भेटही घेतली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2017 11:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...