औरंगाबादेत वर्गमित्राचा तरुणीवर बलात्कार.. म्हणाला, अश्लील फोटो FB वर व्हायरल करतो

लग्नाचे आमिष दाखवून 20 वर्षीय तरुणीवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर अश्लील फोटो फेसबुकवर पोस्ट करण्याची धमकी दिली.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 06:17 PM IST

औरंगाबादेत वर्गमित्राचा तरुणीवर बलात्कार.. म्हणाला, अश्लील फोटो FB वर व्हायरल करतो

औरंगाबाद, 1 ऑगस्ट- लग्नाचे आमिष दाखवून 20 वर्षीय तरुणीवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर अश्लील फोटो फेसबुकवर पोस्ट करण्याची धमकी दिली. वाळूजमधील बजाजनगरात ही घटना घडली असून या प्रकरणी आरोपी गौरव जाधव ( वय-22, रा. सिडको, वाळूज महानगर-1) याच्याविरोधात वाळूज एमआयडीसी पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉम्प्युटर क्लासमध्ये झाली होती ओळख..

पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख सात महिन्यांपूर्वी बजाजनगर येथील एका कॉम्प्युटर क्लासमध्ये झाली होती. दरम्यान, आरोपीने तरुणीला प्रपोज केले. तसेच लग्न करण्याचे वचनही दिले. त्यानंतर तिने आरोपीचा प्रेमाचा प्रस्ताव स्विकारला. त्यानंतर दोघांच्या गाठी-भेटी सुरू झाल्या. आरोपीने पीडितेला त्याचा मित्र प्रमोद भोसले (22, रा. बजाजनगर) याच्या रूमवर नेऊन तिची इच्छा नसताना तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. नंतर पीडितेने मित्राच्या रूमवर येण्यास नकार दिला असता तिला अश्लील फोटो फेसबूकवर व्हायरल करतो. तसेच तुझ्याशी लग्न करणार नाही, असे धमकावले. या धमकीला बळी पडून पीडिता आरोपीसोबत दुचाकीवरून मित्राच्या रूमवर जात होती. या सात महिन्यांत आरोपीने पीडितेवर अनेकदा बलात्कार केला.

वडिलांनी पाहिल्यावर समोर आले प्रकरण...

दरम्यान, पीडितेला तिच्या वडिलांनी आरोपीच्या दुचाकीवर बसून जात असल्याचे पाहिले. त्याबाबत वडिलांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने तिच्यासोबत झालेला प्रकार सांगितला. आरोपीने त्याच्या मित्राच्या रूमवर नेऊन लग्न करण्याचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले. तसेच माझ्याविरोधात पोलिसांत गेलीस तर दोघांचे फोटो व्हायरल करण्याची आरोपीने धमकी दिल्याचे वडिलांना पीडितेने सांगितले. अखेर 30 जुलै रोजी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये आरोपी गौरव जाधव याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पीडिता पोलिसांत गेल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली आहे.

Loading...

VIDEO :पाण्यामुळे झाली दैना, रस्त्यावरच करावे लागले मृतदेहावर अंत्यसंस्कार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2019 06:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...