महानायकाला विनम्र अभिवादन, नागपुरात लोटला भीमसागर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2017 09:22 AM IST

महानायकाला विनम्र अभिवादन, नागपुरात लोटला भीमसागर

 

14 एप्रिल :   भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 126 वी जयंती आहे. मानवता आणि समनतेचा संदेश देणार्‍या महामानवाला सगळीकडेच 'जय भीम'चा नारा देत मानवंदना दिली जात आहे. नागपुरातील दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी भीमबांधवांनी अलोट गर्दी केली आहे.

या निमित्त महाराष्ट्रासह देभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागपूर, मुंबई, औरंगाबादमध्ये सकाळपासून महानायकाला अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.

एका व्यक्तीनं संपूर्ण समाजाला अहिंसक आणि घटनात्मक मार्गानं अस्पृश्यतेतून बाहेर काढलं, आणि कोट्यवधी जनतेच्या आयुष्यात अमुलाग्र बदल आणला, याचा प्रत्यत जगाला क्वचितच आला असेल.. त्यातली एक वंदनीय व्यक्ती म्हणजे बाबासाहेब.

राज्य सरकारनं 14 एप्रिल हा ज्ञानदिवस म्हणून घोषित केलाय, तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मोदी दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत. त्यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Loading...

दरम्यान, ट्विटरनेही बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी विशेष हॅशटॅग सुरु केले आहेत. बाबासाहेबांशी निगडीत पाच विशिष्ट हॅशटॅग वापरल्यानंतर बाबासाहेबांची प्रतिकृती असलेली इमोजी येईल. संपू्र्ण आठवड्यात हे हॅशटॅग वापरावं असं आवाहन ट्विटर इंडियानं केलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2017 09:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...