वडिलांच्या नावातील वेलांटी काढण्यासाठी भूमापक अधिकाऱ्याने मागितले 5 हजार, झालं असं

वडिलांच्या नावातील वेलांटी काढण्यासाठी भूमापक अधिकाऱ्याने मागितले 5 हजार, झालं असं

लाच घेताना भूमापक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या (ABC)जाळ्यात अडकला. सतिश अर्जुन गायकवाड ( वय-49 ) असे आरोपीचे नाव आहे.

  • Share this:

इंदापूर, 20 जुलै-  लाच घेताना भूमापक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकला. सतिश अर्जुन गायकवाड ( वय-49 ) असे आरोपीचे नाव आहे. अधिकाऱ्यांनी आरोपीने स्विकारलेली चार हजार रुपये ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावातील वेलांटी काढण्यासाठी सतिश गायकवाड पाच हजारांची मागणी केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर शहरातील भूमि अभिलेख कार्यालयात वारस नाव व नोंद बदलण्याची परीक्षक भूमापक अधिकारी सतिश अर्जुन गायकवाड यांनी चार हजार रुपयांची लाच स्विकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (20 जुलै) रंगेहाथ पकडले. पन्नास वर्षीय तक्रारदार यांना वारस नोंद व नावात बदल करणेसाठी आरोपीने पाच हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोड अंती त्यातील चार हजार रुपये शनिवारी देण्याचे ठरले होते. ती रक्कम स्विकारताना आरोपीला अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. आरोपीने स्विकारलेली चार हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

सटाणा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

सटाणा तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालत वायगाव ग्रामपंचायतीच्या कार्यलयासह 3 ठिकाणी चोरी करून पसार झाले. चोरट्यांनी रात्री अगोदर ग्रामपंचायतीच्या कार्यलयाचे कुलूप तोडून कपाटातील महत्वाची कागदपत्रे व धनादेश चोरले त्यानंतर गावातील वेगवेळ्या 3 ठिकाणी चोरी करून रोख रक्कम चोरून पसार झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा हॉस्पिटलमध्ये राडा; पोलिसांवर भडकल्या, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2019 05:49 PM IST

ताज्या बातम्या