S M L

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, सर्व जण सुखरूप

Samruddha Bhambure | Updated On: May 25, 2017 03:06 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, सर्व जण सुखरूप

25 मे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. लातूरहून मुंबईकडं येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं.  सुदैवानं मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील अन्य चारजण सुखरूप आहेत.

भाजपच्या शिवार संवाद यात्रेला आज लातूर जिल्ह्यातील निलंग्यातून सुरुवात झाली. त्यासाठी मुख्यमंत्री लातूरला गेले होते. तिथे श्रमदान केल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईकडं येण्यासाठी निघाले होते. मुंबईकडं येण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरनं टेकऑफ घेतला खरा, पण काही क्षणातच ते जमिनीवर कोसळलं. सुदैवाने, दुर्घटनेच्या वेळी हेलिकॉप्टर जास्त उंचीवर नसल्यानं अनर्थ टळला. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याचं कळतं.

विशेष म्हणजे पंधरादिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला गडचिरोलीत किरकोळ बिघाड झाला होता. त्यानंतर आज पुन्हा निलंग्यात मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याने सीएमच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

दरम्यान, अपघातानंतर काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करून आपण सुखरूप असल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेच्या आशीर्वादामुळं मी सुखरूप आहे. काळजीचं कारण नाही,' असं त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2017 01:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close