चित्रा वाघ यांच्या जागी राष्ट्रवादीने केली नवी नियुक्ती, 'या' महिला नेत्याकडे सोपवली जबाबदारी

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्ष सोडलेल्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 03:02 PM IST

चित्रा वाघ यांच्या जागी राष्ट्रवादीने केली नवी नियुक्ती, 'या' महिला नेत्याकडे सोपवली जबाबदारी

पुणे, 27 जुलै : भाजपच्या वाटेवर असणाऱ्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादीने रुपाली चाकणकर यांची पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. 'राष्ट्रवादीच्या पुणे शहर महिलाध्यक्ष म्हणून मी चांगलं काम केलं. त्याची पावती मिळाली आहे. आता नवी जबाबदारी समर्थपणे पार पाडेन,' असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यपदी निवड करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्ष सोडलेल्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'भाजपने स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत बरं झालं चित्रा वाघ यांना त्यांनी घेतलं,' असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.

जयंत पाटील यांनीही केली होती टीका

'ऊसाच्या खोडव्याला साखरेचा फार उतार पडत नाही. त्यासाठी रान रिकामं करून नवी लागण करावी लागते,' असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर हल्लाबोल केला होता.

दरम्यान, 30 जुलैला आघाडीतील बडे नेते भाजपचं कमळ हाती घेणार आहेत. राष्ट्रवादी नेते मधुकर पिचडांचा मुलगा वैभव पिचड, राष्ट्रवादी नेत्या आणि महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा चित्रा वाघ तसंच काँग्रेस नेते आणि नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकर 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नुकतीच या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती.

Loading...

VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीचे हेच ते नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, गुप्त बैठकीचा हा पुरावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 03:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...