चीनचं स्पेस स्टेशन प्रशांत महासागरात कोसळलं, मुंबईसह महाराष्ट्रावरचा धोका टळला

चीनने २०११ मध्ये सोडलेली 'तियांगोंग' ही अंतराळ प्रयोगशाळा नियंत्रणाबाहेर गेली होती

Sachin Salve | Updated On: Apr 2, 2018 07:55 AM IST

चीनचं स्पेस स्टेशन प्रशांत महासागरात कोसळलं, मुंबईसह महाराष्ट्रावरचा धोका टळला

मुंबई, 02 एप्रिल : अवघ्या जगाचं लक्ष्य लागून असलेली  चीनची 'तियांगोंग' अंतराळ प्रयोगशाळा अखेर प्रशांत महासागरात कोसळली आहे. तियांगोंग प्रशांत महासागरात कोसळल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रावरचा धोका टळला आहे.

चीनने २०११ मध्ये सोडलेली 'तियांगोंग' ही अंतराळ प्रयोगशाळा नियंत्रणाबाहेर गेली होती. 'तियांगोंग' नेमकी कोणत्या ठिकाणी कोसळणार हे निश्चित नव्हते, त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते. तियांगोंग अंतराळ प्रयोगशाळा ही मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागात कोसळण्याची भीती होती.  जगभरातील अवकाश संशोधन संस्था या घटनेवर सतत लक्ष देत आहेत.

खगोलतज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 2.44 ते 2.49 या चार मिनिटांच्या सुमारास'तियांगोंग' प्रयोगशाळा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर दिसण्याची शक्यता होती. मात्र, तसं काही घडलं नाही. त्यामुळे भारतावरचा धोका आता टळला होता. युरोपियन अंतराळ संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 4 ते 8 वाजेच्या दरम्यान ही प्रयोगशाळा पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत येऊ शकते. अखेर हे स्पेश स्टेशन प्रशांत महासागरात कोसळलं आणि युरोपसह चीनचा जीव भांड्यात पडला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 2, 2018 07:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close