मूकबधीर आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणात आता मुख्यमंत्र्यांची एंट्री

मूकबधीर आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणात आता मुख्यमंत्र्यांची एंट्री

आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या मूकबधीर आंदोलकांवर पुणे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

  • Share this:

पुणे, 26 फेब्रुवारी : मूकबधीर आंदोलकांवर परवानगी न घेता मोर्चा काढल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र त्यानंतर झालेल्या मोठ्या टीकेनंतर आता पोलीस आणि सरकार बॅकफूटवर गेलं आहे. आंदोलकांवर गुन्हे दाखल करु नयेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या मूकबधीर आंदोलकांवर पुणे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. आणि त्यानंतर आंदोलकांवरच गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या. दंगल माजवणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरूही झाली होती. आंदोलकांचे नेते प्रदीप मोरे आणि पटवारी यांच्यासह दोन ते अडीच हजार आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार होता.

या संतापजनक प्रकारानंतर पुणे पोलीस आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठली. त्यामुळे अखेर रात्री उशिरा आंदोलकांवर गुन्हे दाखल करु नयेत, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ससामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलकांशी चर्चा करुन मार्ग काढावा, अशाही सूचना मुख्यमंत्री फडणवीसांकडून देण्यात आल्या आहेत.

'मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

पुण्यात कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'पोलिसांनी जो कर्णबधीर आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्याचा मी धिक्कार करते, राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली पाहिजे. नाहीतर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे' अशी मागणी सुळे यांनी केली.

'...म्हणून आम्ही बळाचा वापर केला'

लाठीचार्जप्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांची बाजू मांडली आहे. जमाव आमच्यावर चालून आला होता, त्यामुळे गोंधळ उडाला होता, पण आम्ही लाठीचार्ज केला नाही, असा दावाच पुणे पोलिसांनी केला.


VIDEO : राज ठाकरे कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या भेटीला, म्हणाले, 'यांचा शाप लागेल सरकारला'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 07:42 AM IST

ताज्या बातम्या