News18 Lokmat

मुंबईत शेतकरी आले कुठून? मुख्यमंत्र्यांनाच पडला प्रश्न !

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जिल्हानिहाय आकडेवारीत ट्विटरवरून प्रसिद्ध केलीय. विशेष म्हणजे कर्जमाफीच्या या लाभार्थी यादीत चक्क मुंबईसह उपनगरातील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाल्याचं आढळून आलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2017 01:24 PM IST

मुंबईत शेतकरी आले कुठून? मुख्यमंत्र्यांनाच पडला प्रश्न !

04जुलै : मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जिल्हानिहाय आकडेवारीत ट्विटरवरून प्रसिद्ध केलीय. विशेष म्हणजे कर्जमाफीच्या या लाभार्थी यादीत चक्क मुंबईसह उपनगरातील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाल्याचं आढळून आलंय. पण मुंबईसारख्या मेट्रोसिटीत शेतकरी नेमके आले कुठून हा प्रश्न दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनाही पडलाय. याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देखील चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे आता जाहीर झालेल्या प्रस्तावित लाभार्थी यादीत नेमके खरे शेतकरी किती आहेत याची व्यवस्थित चौकशी करूनच मगच कर्जमाफी दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

मुंबई आणि उपनगरात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे यादीत दिसत आहे. या शेतकऱ्यांची जमीन कदाचित मुंबईलगत असण्याची शक्यता आहे, या शेतकऱ्यांनी मुंबईतील बँकांमधून कर्ज घेतले असण्याची शक्यता आहे. कर्जमाफी करताना प्रत्यक्ष चौकशीत सगळया गोष्टी स्पष्ट होतील,असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत कर्जमाफीचे सर्वाधिक लाभार्थी हे बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. तर सर्वात कमी फायदा हा पालघर जिल्ह्याला झालाय. बुलडाण्यात 2 लाख 49 हजार 818 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झालंय तर पालघर जिल्ह्यात मात्र, याच कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची संख्या अवघी 918 इतकी आहे.

प्रस्तावित कर्जमाफीचे सर्वाधिक लाभार्थी असलेले जिल्हे

बुलडाणा-     2,49,818

यवतमाळ-    2,42,471

बीड -          2,08,480

अहमदनगर - 2,00,869

जालना -      1,96, 463

प्रस्तावित कर्जमाफीचे सगळ्यात कमी लाभार्थी असलेले जिल्हे  

पालघर- 918

रायगड- 10,809

ठाणे- 23,505

सिंधुदुर्ग- 24,447

नंदुरबार - 33,556

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2017 01:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...