मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहिले म्हणून..,खडसेंनी पुन्हा व्यक्त केली खदखद

केंद्र आणि राज्य सरकारने पाच वर्षांच्या काळामध्ये विकासाची कामे करीत अनेक चांगले निर्णय घेतले आहे आणि या विकास कामामुळेच जनता पुन्हा एकदा मोदी सरकारला प्रतिसाद देईल'

News18 Lokmat | Updated On: Mar 16, 2019 11:44 PM IST

मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहिले म्हणून..,खडसेंनी पुन्हा व्यक्त केली खदखद

इम्तियाज जलील, प्रतिनिधी

जळगाव, 16 मार्च : 'माणसाने स्वप्न पाहणे आवश्यक आहे, मात्र स्वप्न असं पाहिले पाहिजे की चांगल्या चांगल्यांच्या झोपा या मोडल्या पाहिजे, जसे मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले आणि अनेकांच्या झोप उडाल्या होत्या', असं विद्यार्थ्यांना उदाहरण देत पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपली खदखद बोलून दाखवली. निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात भुसावळ येथे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील नाहाटा विद्यालय येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि गुरुनाथ फाउंडेशनच्या वतीने निबंध स्पर्धेच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खडसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयातील जीवनापासूनच आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करताना विद्यार्थ्यांनी मोठे होण्याचं स्वप्न पाहणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला. मात्र, स्वप्न पाहताना असे स्वप्न पाहा की, ज्यामुळे अनेकांच्या झोप या उडाल्या पाहिजे, जसं मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं आणि अनेकांच्या झोप त्यामुळे उडाल्या होत्या, अशा स्वरूपाचं उदाहरण देत खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातली सल या निमित्ताने व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळते याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. गिरीश महाजन यांच्या गटाच्या उमेदवाराला तिकीट मिळते की खडसे गटाच्या उमेदवाराला तिकीट मिळते या विषयी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे. या विषयवार बोलताना खडसे यांनी म्हटलं की, 'पार्लमेंटरी बोर्ड उमेदवारी देण्याचा निर्णय घेताना कोण कुणाचं यावर निर्णय घेत नाही तर उमेदवाराचं काम, त्याची निवडून येण्याची क्षमता पाहून लोकशाही मार्गाने निर्णय घेतला जात असल्यानं अशा प्रकारच्या चर्च्यांना कोणताही अर्थ नसल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या सभांना सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याचा युतीला परिणाम होईल का असा प्रश्न विचारण्यात आला असता खडसे यांनी म्हटलं आहे की, 'त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण, केंद्र आणि राज्य सरकारने पाच वर्षांच्या काळामध्ये विकासाची कामे करीत अनेक चांगले निर्णय घेतले आहे आणि या विकास कामामुळेच जनता पुन्हा एकदा मोदी सरकारला प्रतिसाद देईल', असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला आहे.

Loading...

===============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 11:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...