हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्री पुन्हा बचावले !

हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्री पुन्हा बचावले !

हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षारक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

  • Share this:

अलिबाग, 6 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पुन्हा एकदा सुदैवाने हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.

अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ते आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री डोलवी-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरमध्ये बसण्याकरीता चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास प्रारंभ केला. त्यावेळी हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षारक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. रायगडचे जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय.

मुख्यमंत्री कार्यालयाचा खुलासा

मुख्यमंत्री रायगड जिल्हातील अलिबाग येथे आज एका कार्यक्रमासाठी गेले होते. परतत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, असा कुठलाही अपघात झाला नसून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2017 03:16 PM IST

ताज्या बातम्या