भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार मंत्र्यांना नाहीत- मुख्यमंत्री

भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार मंत्र्यांना नाहीत- मुख्यमंत्री

सुभाष देसाईंनी नाणारमध्ये भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचं जे वक्तव्य केलंय ते त्यांचं वैयक्तिक मत असेल, अशी कुठलीही अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

  • Share this:

23 एप्रिल : सुभाष देसाईंनी नाणारमध्ये भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचं जे वक्तव्य केलंय ते त्यांचं वैयक्तिक मत असेल, अशी कुठलीही अधिसूचना रद्द  करण्यात आलेली नाही. अशी अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार मंत्र्यांना नाहीत. ही प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

आज नाणारमध्या शिवसेनेची सभा झाली. त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, अशी गर्जना आज उद्धव ठाकरेंनी नाणारमध्ये केली. प्रकल्पासाठीची एमआयडीसीची अधिसूचना रद्द केली आहे, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

नाणार प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेना आमनेसामने आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2018 02:50 PM IST

ताज्या बातम्या