पुणे, 12 नोव्हेंबर : लाभार्थी जाहिरातीत शेतकऱ्यांच्या छापून आलेल्या फोटोंमुळे विरोधकांच्या पोटात मळमळ होऊ लागल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. दौंड इथल्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभावेळी ते बोलत होते.
लाभार्थी जाहिरातीतल्या शेतकऱ्यांवर विरोधकांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना धमकावण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय. आघाडी सरकारच्या काळात लाभार्थी जाहिराती झाल्या नाहीत कारण खरे लाभार्थी तर तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांचे कच्चेबच्चे होते अशी टीकाही त्यांनी केलीये.
ते म्हणाले, आम्हाला दररोज विचारता, आम्ही उत्तर देतो, धारिष्ट्य दाखवतो. पंधरा वर्ष यांनी काय केलं, शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्याला आम्ही सामोरे गेलो, देशातील सगळ्यात मोठी कर्जमाफी दिलीय. मी असा मुख्यमंत्री ज्याचा कारखाना नाही, सूतगिरणी नाही, शिक्षणसंस्था नाही. त्यामुळे पैसे ठेवून काय करायचं? काही लोकांना वाटत होत राहुल नापास व्हावा. म्हणून काही लोक अडवणूक करत होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा