लोकसभा पोटनिवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री पालघरमध्ये

लोकसभा पोटनिवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री पालघरमध्ये

भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पालघरच्या दौऱ्यावर आहेत.

  • Share this:

पालघर, २० मे : पालघर लोकसभा पोट निवडणूक- जसजसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसतसा पालघर लोकसभा पोट निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. सर्वच पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.

भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पालघरच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 11 वाजता डहाणू तालुक्यातील कासा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. तर संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री वसई येथे प्रचार सभा घेतील.

भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आज पालघरच्या दौऱ्यावर आहेत. येत्या 28 तारखेला पालघर लोकसभा पोट निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2018 10:24 AM IST

ताज्या बातम्या