S M L

स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक कधीही चांगला, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांनी पवारांच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं.

Sonali Deshpande | Updated On: Oct 23, 2017 05:57 PM IST

स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक कधीही चांगला, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

अमरावती, 23 आॅक्टोबर : अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांनी पवारांच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं. पक्षीय भेदाभेद पवारांनी कधीच केला नाही. पवारांसारखा दिलदार विरोधक बरा असे उद्गार काढत मुख्यमंत्र्यांनी स्वार्थी मित्र नको म्हणत अप्रत्यक्ष शिवसेनेला या कार्यक्रमादरम्यान टोला लगावला.

पवारांनीही अमरावतीकरांचे नागरी सन्मानासाठी मनापासून आभार मानले. दरम्यान या कार्यक्रमात मुख्यमंत्री व्यासपीठावर असल्यानं अशोक चव्हाणांनी व्यासपीठावर येणं मुद्दाम टाळल्याचं पाहायला मिळालं.

या सोहळ्यात बोलताना शरद पवार म्हणाले, 'अमरावतीचा माझा जुना संबंध. तरुण नेता असताना अमरावतीत मी आलो होतो. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या सहवासानं मला प्रेरणा मिळाली. पंजाबराव देशमुख यांनी अमरावतीला शैक्षणिक शहर बनवलं.'

ते म्हणाले, 'मी शेतीखात्यात १० वर्षे काम केले. माझी एक सवय होती जुन्या फाईली काढायचो आणि शिकायचो. शेतीखात्याची धुरा सांभाळताना पंजाबराव देशमुख आणि सी सुब्रम्युणम यांच्या जुन्या फाईली मी काढल्या आणि अभ्यास केला. अप्रमाणित किटकनाशक विकणाऱ्या कंपन्यावर मुख्यमंत्र्यांनी खटले भरावे पण नव्या वाणाला विरोध करू नये. कर्जमाफी हा अंतिम पर्याय नाही. उत्पादन खर्चापेक्षा पन्नास टक्के नफा देणाची गरज आहे. लाखो कोटी रुपये उद्योगपतींनी बुडवले पण आमचा शेतकरी हा प्रामाणिक आहे. शेती प्रश्नावर काढलेल्या दिंडीत एक लाख लोक सहभागी झाले होते.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2017 05:57 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close