मुख्यमंत्री 2 जागांवर लढवणार विधानसभा निवडणूक? 'हा' असेल दुसरा मतदारसंघ

मुख्यमंत्री 2 जागांवर लढवणार विधानसभा निवडणूक? 'हा' असेल दुसरा मतदारसंघ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन ठिकाणाहून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी भाजपनं चांगलीच कंबर कसली आहे.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातून रोज नवनवीन माहिती ऐकायला मिळत आहे. यामुळे राजकीय गरमागरमीदेखील वाढत आहे. या चर्चांदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण वृत्त समोर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन ठिकाणाहून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. नागपूर आणि मुंबई अशा दोन ठिकाणाहून मुख्यमंत्री आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं म्हटलं जात आहे.

(पाहा : VIDEO : प्रेयसीच्या घरी रंगेहात सापडला पती, मग काय पत्नीने धु-धु धुतले)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुंबईत देखील एका मतदारसंघाची चाचपणी करण्यात येते आहे. यासाठी मुंबईतील मलबार हिल विधानसभा हा सुरक्षित पर्याय देण्यात आला आहे. हा पर्याय मान्य झाल्यास देवेंद्र फडणवीस नागपूर आणि मुंबई दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवणार यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केल्यास काय होईल? असं मत एका एजन्सीमार्फत जाणून घेण्यात आलं आहे. मलबार हिल भाजपचा बालेकिल्ला असल्याने हा मतदारसंघ मुख्यमंत्री यांच्यासाठी योग्य मानला जात आहे. मलबार हिल हा आमदार मंगल प्रभात लोढा यांचा मतदार संघ असून त्यांच्यावर मुंबई प्रदेश भाजप अध्यक्षपदाची जबादारी सोपवण्यात आली आहे. पुढे अन्य जबाबदारी देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती आहे.

(पाहा : VIDEO : बकरा चोरणे तरुणांना पडले महागात, संतप्त जमावाने मोडलं कंबरडं!)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप आता राज्यातील विधानसभा निवडणुकीतही अभूतपूर्व विजय मिळवण्यासाठी कामाला लागली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रथयात्रा काढणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. 'फिर एक बार शिवशाही सरकार' आणि 'अब की बार 220 के पार' या टॅगलाइनसह रथयात्रा काढण्यात येणार आहे.  याबाबत माहिती देताना पाटील म्हणाले की ,'ऑगस्ट महिन्यामध्ये मुख्यमंत्री विकासयात्रा काढणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ही यात्रा काढणार आहेत. तसंच शिवसेना-भाजपची सर्व 288 जागांसाठी तयारी सुरू आहे'.

(पाहा : या 10 दिवसात आघाडीला पडणार खिंडार, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट)

वेदनेनं त्रस्त तरुणीचा रुग्णालयात हायहोल्टेज ड्रामा, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 08:08 PM IST

ताज्या बातम्या