मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांची घोषणाबाजी

नाशिकच्या लासलगावात महाकोल्ड स्टोरेजचं भूमिपूजन आज करण्यात आलं. मुख्यमंत्री बोलत असताना काही शेतकऱ्यांची घोषणाबाजी केली.पण मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवत, शेतकऱ्यांशी भाषणातून संवाद साधत कार्यक्रमातला गोंधळ थांबवला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2017 04:47 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांची घोषणाबाजी

30 जून : नाशिकच्या लासलगावात महाकोल्ड स्टोरेजचं भूमिपूजन आज करण्यात आलं. राज्यातील हे पहिलं बहुउद्देशीय कोल्ड स्टोरेज असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कांदा, डाळिंबं, द्राक्षं, आंबे यासाठी हे कोल्ड स्टोरेज उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री बोलत असताना काही शेतकऱ्यांची घोषणाबाजी केली.पण मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवत, शेतकऱ्यांशी भाषणातून संवाद साधत कार्यक्रमातला गोंधळ थांबवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2017 04:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...