News18 Lokmat

आरक्षणाच्या हालचालींना वेग, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची रात्री उशीरा बैठक

मुंबईत मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी यांची बैठक रात्री उशीरा 1 वाजता संपली.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2018 07:53 AM IST

आरक्षणाच्या हालचालींना वेग, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची रात्री उशीरा बैठक

मुंबई, 27 जुलै : मुंबईत मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी यांची बैठक रात्री उशीरा 1 वाजता संपली. यात मराठा आरक्षणासंदर्भात मागास आयोगाचा अहवाल राज्यसरकारने लवकरात लवकर द्यावा अशी भूमिका मांडण्यात आली. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी विधानसभेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक उद्या बोलवण्यात येणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची मतं जाणून घेण्यात येणार आहेत.

या बैठकीत आरक्षण देण्याबद्दल चर्चा करण्यात आली आहे. यात मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. इतकी वर्ष खोळंबलेल्या या विषयावर अखेर आता भाजप तोडगा काढणार आहे, असं भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. हा मुद्दा न्यायालयात आहेत. खरंतर मागच्या सरकारमुळे मराठा आरक्षण खोळंबल्याची टीकाही दानवे यांनी केली आहे. तर मराठा आरक्षणासाठी चाललेल्या या आंदोलनावर मुख्यमंत्री सर्व पक्षांची शनिवारी बैठक घेणार आहे. यासाठी काल सगळ्यांना निमंत्रणही पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर आम्ही लवकरच तोडगा काढू असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

नवी मुंबईत बंददरम्यान जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर राज्यात नेतृत्त्वबदलाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. मात्र या सगळ्या वावड्या असल्याचं आता उघड झालंय. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा म्हणजे फक्त अफवा असल्याचं सांगत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय.

काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचा राजीनामा

Loading...

आतापर्यंत एकूण तीन आमदारांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. आज पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी सुद्धा राजीनामा दिलाय. मराठा, धनगर, महादेव कोळी आणि मुस्लिम समाजाला वेळोवेळी आरक्षण मिळावे अशी मागणी वारंवार होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत तोंडी आश्वासन दिलं पण याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले असताना मला लोकप्रतिनिधी म्हणून या पदावर राहण्याचा नैतिकता वाटत नाही असं भालके यांनी सांगितलंय. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे फॅक्सद्वारे पाठवला आहे.

मराठा आरक्षणासाठी तावडेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढाच!, शिवसेना आमदाराचा राजीनामा

गेल्या चार दिवसांपासून मराठा ठोक आंदोलन राज्यभरात सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 24 जुलै रोजी ठिय्या आंदोलन केलं होतं. आणि सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश 24 तासात काढावा अशी मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यामुळे हर्षवर्धन जाधव यांनी आपला राजीनामा ई-मेलद्वारे विधानसभा अध्यक्षांना पाठवला. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही राजीनामा दिलाय. दोन्ही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवलाय. भाऊसाहेब चिकटगावकर हे राष्ट्रवादीचे वैजापूरचे आमदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असं चिकटगावकर यांनी सांगितलं.

हेही वाचा...

माझ्या वक्तव्याचा तसा अर्थ नव्हता,पंकजा मुंडेंचं यु-टर्न

VIDEO : शिवराज सिंह पायरी चुकले,स्टेजवरून कोसळले

VIDEO : धावत्या ट्रकखाली त्याने दिले झोकून,थरकाप उडवणारे दृश्य सीसीटीव्हीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2018 07:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...