कार्यकर्त्यांसाठी छगन भुजबळ यांनी केलं पहिलं ट्विट

आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगून जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ सोशल मीडियात सक्रिय झाले आहेत. भुजबळ यांनी स्वत:चं ट्विटर अकाउंट सुरू केलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 20, 2018 05:19 PM IST

कार्यकर्त्यांसाठी छगन भुजबळ यांनी केलं पहिलं ट्विट

20 मे : आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगून जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ सोशल मीडियात सक्रिय झाले आहेत. भुजबळ यांनी स्वत:चं ट्विटर अकाउंट सुरू केलं आहे.

या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी कार्यकर्त्यांसाठी संदेशाचं पहिलं ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटरमुळे भुजबळ समर्थकांना मोठा दिलास मिळाला आहे.

त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केलेल्या या ट्विटमध्ये लिहलं आहे की, 'माझ्यावर विश्वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली, त्यामुळे मी आपला आभारी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात. याची मला कल्पना आहे. माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे.'

'वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी तुमच्याशी प्रत्यक्ष बोलेन,' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. भुजबळ यांच्या या ट्विटमुळे त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2018 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...