Lok Sabha Election 2019 : 'घाबरलो असतो तर घरी बसलो असतो'

Lok Sabha Election 2019 : 'घाबरलो असतो तर घरी बसलो असतो'

नाशिकमध्ये समीर भुजबळांना उमेदवारी दिल्यानंतर आता छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

  • Share this:

नाशिक, 15 मार्च : नाशिकमधून समीर भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिल्यानंतर छगन भुजबळांचा पत्ता का कापला गेला? अशी चर्चा रंगली. त्यानंतर आता छगन भुजवळ यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिलं. आम्ही जर घाबरलो असतो तर घरीच बसलो असतो. जाहीर सभा घेतल्या नसत्या. युवकांना संधी मिळावी या उद्देशानं राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. पण, पुतणे समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसनं आत्तापर्यंत 17 उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


आणखी काय म्हणाले भुजबळ?

यावेळी बोलताना शरद पवार यांनी आत्तापर्यंत पराभव पाहिलेला नाही. त्यामुळे माघार घेण्याचा संबंध नाही. वंचित आघाडी सोबत यावी यासाठी प्रयत्न केले. त्यांना 4 जागा द्यायची तयारी होती. मात्र आरएसएसवरील बंदी या मागणीमुळे बोलणी फिस्कटल्याचं भुजबळ यांनी म्हटलं. तसेच वंचित आघाडीला, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत समझोता करण्यात रस नव्हता असं आमचं मत असल्याचं देखील भुजबळ यांनी म्हटलं आहे.


बहुजन वंचित आघाडीची पहिली यादी जाहीर, प्रकाश आंबेडकरांच्या मतदारसंघावरुन सस्पेंन्स कायम


सरकारनं विकास कामे केली नाहीत

नोटबंदी, जीएसटी, कर्जमाफी, शेतकरी विरोधी धोरणं यामुळं सरकार विरोधात रोष आहे. नाशिकचा विकास मागील साडेचार वर्षापासून थांबला आहे. भुजबळांना श्रेय मिळू नये म्हणून विकासकामे केली नाहीत. नाशिक बेवारस झालं असून विचारणारं कुणी नाही. अशी टीका यावेळी भुजबळ यांनी केली. आमच्या दोन्ही जागा येणार असा विश्वास यावेळी भुजबळांनी व्यक्त केला.


मावळमधून राष्ट्रवादीचा उदय होणार?; अशी आहेत राजकीय समीकरणे


कोण आहेत राष्ट्रवादीचे 17 उमेदवार?

राष्ट्रवादी काँग्रेसनं आत्तापर्यंत 17 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये सुनील तटकरे- रायगड, सुप्रिया सुळे - बारामती, उदयनराजे भोसले - सातारा, आनंद परांजपे - ठाणे, गुलाबराव देवकर - जळगाव, राजेंद्र शिंगणे - बुलढाणा, राजेश विटेकर - परभणी, संजय दिना पाटील- ईशान्य मुंबई, बाबाजी पाटील - कल्याण, धनंजय महाडिक - कोल्हापूर, समीर भुजबळ- नाशिक, डॉ.अमोल कोल्हे - शिरुर, धनराज महाले - दिंडोरी, पार्थ पवार, मावळ आणि बजरंग सोनवणे - बीड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


VIDEO :...जेव्हा अजितदादांचा मोबाईल हरवतो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 07:21 PM IST

ताज्या बातम्या