News18 Lokmat

'जेट'ने चुकवला भुजबळ, मुंडेच्या काळजाचा ठोका

डॉक्टरला एका खासगी रुग्णालयात नेऊन त्यांची तपासणी करण्यात आली.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2018 10:07 AM IST

'जेट'ने चुकवला भुजबळ, मुंडेच्या काळजाचा ठोका

औरंगाबाद, ३० सप्टेंबर २०१८- मुंबईहून औरंगाबादकडे निघालेल्या जेट एअरवेज विमानानं उड्डानानंतर वीस मिनिटांनी हवेतच हेलकावे खायला सुरुवात केली आणि आतील प्रवाशांच्या हृदयाचे ठोके चुकले. काही क्षणात विमान वेगाने खाली येऊ लागले. हा भीतीदायक प्रकार काही मिनिटं सुरु होता. यानंतर पुन्हा विमानानं ठराविक उंची गाठली आणि विमान औरंगाबाद विमानतळावर मोठ्या प्रयत्नांनी उतरविण्यात आलं आणि प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

या विमानामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळही होते. तसेच खासदार प्रीतम मुंडे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड प्रवास करत होते. मुंबईहून संध्याकाळी ०४.४६ मिनिटांनी निघालेले विमान धावपट्टीवर उतरवताना जोरदार धक्के जाणवल्याची प्रवाशांनी तक्रार केली. यात एका डॉक्टरचं डोके विमानात आदळलं. या डॉक्टरला एका खासगी रुग्णालयात नेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांचे अहवाल नॉर्मल आल्यानंतर प्रकरण सामंज्यस्याने मिटविण्यात आले.

काही प्नवाशांना उलट्यांचा त्रास झाल्याचीही तक्रार करण्यात आली. याबाबत विमानतळ आणि विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं सांगितलं.

Exclusive: पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल' म्हणते...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2018 10:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...