VIDEO : चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा,बेवारस सुटकेसमध्ये सापडली गॅसबत्ती

मात्र, हा फोन नक्की कुणी आणि का केला याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2018 04:04 PM IST

VIDEO : चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा,बेवारस सुटकेसमध्ये सापडली गॅसबत्ती

VIDEO :

विनय म्हात्रे, पनवेल, 21 ऑक्टोबर : दहशतवादी संघटना 'लष्कर ए तोयबा'ने चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवला आहे, अशा आशयाचा एक निनावी फोनमुळे सुरक्षा यंत्रणेची एकच धावपळ उडाली होती. मात्र, ही निव्वळ अफवा असल्याचं समोर आलंय. पनवेल स्थानकावर जेव्हा गाडी पोहोचली तेव्हा हाती काही लागले नाही.

दुपारी अडीच वाजता चेन्नई एक्स्प्रेस पनवेलला येताच ट्रेनमध्ये स्फोट होईल, असं या फोनवरुन सांगण्यात आलं होतं. त्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पनवेल स्टेशनवर दुपारी २.३० च्या सुमारास चेन्नई एक्स्प्रेस पोहोचली. त्याआधीच रेल्वे पोलिसांनी एक्स्प्रेसमध्ये तपासणी केली. पनवेल स्थानकावर आल्यानंतर गाडीत एक बेवारस सुटकेस आढळली.

पोलिसांनी ही सुटकेस पनवेल स्थानकावर आणली आणि उघडून पाहिली असता त्यामुळे गॅसबत्ती आढळली. गॅसबत्ती आढल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. पनवेलवरून चेन्नई एक्स्प्रेस पुढे मुंबईच्या दिशेनं रवाना झाली.

मात्र, हा फोन नक्की कुणी आणि का केला याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading...

========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2018 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...