S M L

काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत- अशोक चव्हाण

'काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, पक्षातून कुणी गेलं तर नवीन नेतृत्वं उभं राहतं', अशा कठोर शब्दात अशोक चव्हाणांनी नारायण राणेंच्या बहुचर्चित भाजप प्रवेशावर टीका केलीय.

Chandrakant Funde | Updated On: Aug 16, 2017 05:55 PM IST

काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत- अशोक चव्हाण

मुंबई, 16 ऑगस्ट : 'काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, पक्षातून कुणी गेलं तर नवीन नेतृत्वं उभं राहतं', अशा कठोर शब्दात अशोक चव्हाणांनी नारायण राणेंच्या बहुचर्चित भाजप प्रवेशावर टीका केलीय. गेल्या काही दिवसांपासून राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी हे सडेतोड उत्तर दिलंय.

राजकारणातले काही लोक दलबदलू असतात, त्यामुळे पक्षातून कुणी गेलं तर त्याचा पक्षाला फारसा फरक पडत नाही. उलटपक्षी नवीने लोकांना संधी मिळते. असंही अशोक चव्हाणांनी म्हटलंय. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये नारायण राणे गेल्या काही दिवसांपासून राजकीय दृष्ट्या अस्वस्थ आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाच्याही बातम्या अधूनमधून येत असतात. एवढंच नाहीतर राणेही काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसतात.

आता मराठा मोर्चाच्या निमित्ताने तर राणे आणि भाजपामधली वाढती जवळीक पुन्हा अधोरेखित झालीय. या बदलत्या राजकीय परिस्थितीवरच पत्रकारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना थेट प्रश्न विचारला असता त्यांनी प्रथमच नारायण राणेंवर नाव न घेता टीकास्त्रं सोडलंय. आता राणे यावर काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 05:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close