अनिकेत कोथळे खून प्रकरणी आरोपपत्र दाखल

प्रत्यक्षदर्शी, परिस्थितीजन्य, वैद्यकीय, तांत्रिक पुरावे सीआयडीच्या पथकाने जमा केले आहेत. सव्व्वाशेहुन अधिक जणांचे जबाबही नोंदवले होते.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 5, 2018 06:55 PM IST

अनिकेत कोथळे खून प्रकरणी आरोपपत्र दाखल

05 फेब्रुवारी : सांगलीतल्या अनिकेत कोथळे कोठडी मृत्यूप्रकरणी सीआयडीनं आज आरोपपत्र दाखल केलं. पीएसआय युवराज कामटेसह सात जणांची आरोपपत्रात नावं आहेत. सातशे पानांच्या आरोपपत्रात 55 जणांच्या साक्षी जबाब नोंदवण्यात आल्या आहेत.

6 नोव्हेंबर 2017 ला चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या अनिकेत कोथळेची कोठडीत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अटकेतील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सात जणांविरुद्ध आज सोमवारी सीआयडीकडून जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. अनिकेतच्या खून प्रकरणाला येत्या ६ फेब्रुवारीला ९० दिवस पूर्ण होत असल्याने, तत्पूर्वी आरोपपत्र दाखल करावे लागणार होतं. उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, गाडीचालक राहुल शिंगटे, झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले, बाळासाहेब कांबळे यांना अटक केली आहे. हे सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दि. 7 रोजी आंबोली घाटात त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. याप्रकरणी यापूर्वीच पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, गाडीचालक राहुल शिंगटे, झीरो पोलीस झाकीर पट्टेवाले, बाळासाहेब कांबळे यांना अटक केली आहे. हे सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान, याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी, परिस्थितीजन्य, वैद्यकीय, तांत्रिक पुरावे सीआयडीच्या पथकाने जमा केले आहेत. त्याशिवाय आतापर्यंत 55 हून अधिक जणांचे जबाबही नोंदवले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2018 06:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...