22 एप्रिल : बातमी आहे News 18 लोकमतच्या दणक्याची. चंद्रभागा नदीच्या स्नानासाठी येणाऱ्या महिला भाविकांच्या गैरसुविधांकडे न्यूज १८ लोकमतने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या बातमीच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर मांडल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी न्युज १८ लोकमतच्या बातमीची गांभीर्याने दखल घेत चंद्रभागेच्या तीरावर चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ही बातमी प्रसिद्ध होण्यापूर्वी चंद्रभागेच्या स्नानासाठी येणाऱ्या महिलांना आपल्या अंगावरील ओले कपडे हे उघड्यावर बदलावे लागत होते, कपडे बदलण्याची सुविधा नसल्याने महिलांची होणारी ही कुचंबणा दूर करण्यासाठी आता मंदिर समितीने पुढाकार घेतला असून चंद्रभागेच्या तीरावर कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम उभा केल्या आहेत.
या सुविधेमुळे स्नानासाठी येणाऱ्या महिला भगिनींची फार मोठी गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा