अभिमानास्पद! CHANDRAYAAN-2 चं हे आहे 'महाराष्ट्र' कनेक्शन

‘वालचंदनगर इंडस्ट्री’ आणि इस्रोचं खास नातं आहे. इस्रोसाठी हा उद्योग 1973 पासून मोटार, बुस्टर आणि इतर उच्च क्षमतेच्या मशिन्स बनविण्याचं काम करतोय.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 01:34 AM IST

अभिमानास्पद! CHANDRAYAAN-2 चं हे आहे 'महाराष्ट्र' कनेक्शन

मुंबई 15 जुलै : चांद्रयान-2 हा भारताच्या अंतराळ मोहिमेतला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. भारताच्या अंतराळ संशोधनाला या मोहिमेने आणखी गती मिळणार आहे. अशी क्षमता मिळवणारा भारत हा जगातला चवथा देश आहे. या आधी रशिया, अमेरिका आणि चीन याच देशांनी अशा प्रकारचं अंतराळ मिशन यशस्वी केलं होतं. ही मोहीम फक्त भारतासाठी नाही तर सर्व मानव समाजाच्याच हितासाठी आहे असं इस्रोने म्हटलं आहे. भारताची मान उंचावणाऱ्या या मोहिमेत आपल्या महाराष्ट्राचाही वाटा आहे ही प्रत्येक मराठी माणसाला वाटणारी अभिमानाची गोष्ट आहे.

रशियाने भारताच्या चांद्रमोहिमेस मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 2015 मध्ये त्यांनी सहकार्य करण्यास नकार दिला. नंतर अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने भारतासाठी मदतीचा हात पुढे केला. मात्र दुसऱ्यांवर आता अवलंबून राहणार नाही असा निश्चय करत इस्रोने चांद्रयान मोहीम स्वदेशी तंत्रज्ञानावर करण्याचा निर्णय घेतला. हे काम अवघड होतं पण अशक्य नाही याची शास्त्रज्ञांना जाणीव होती.

राज्य सरकारने केल्या 46 पोलीस श्वानांच्या बदल्या, आरोप-प्रत्यारोप सुरू!

स्वदेशी तंत्रज्ञान

या निर्णयामुळे मोहिमेला काही वर्ष उशीर झाला पण कठीण परिश्रम आणि संशोधनाच्या जोरावर भारताने सर्व तंत्रज्ञान विकसित केलं. भारताच्या या मोहिमेला 950 कोटींच्या आसपास खर्च आलाय. इस्रोने अवघ्या तीन-चार वर्षात चांद्रयानाचे तीनही अत्यंत महत्त्वाचे भाग अर्थात Lander, Rovher आणि सॉफ्ट लँडींग टेक्नॉलॉजी  ही भारतीय तंत्रज्ञान वापरून विकसित केली.

Loading...

त्यासाठी देशातल्या 620 संस्था, 500 विद्यापीठं आणि 120 खासगी कंपन्यांच्या मदतीनं इस्रोने हे यश साध्य केलं. यात महाराष्ट्रातल्या विख्यात ‘वालचंदनगर इंडस्ट्री’चाही सहभाग आहे. यासाठीचं अतिशय उच्च क्षमतेचं 'बुस्टर' वालचंद नगर इथं बनविण्यात आलंय. या आधीही वालचंदनगर

VIDEO : राज्यात पाडला जाणार कृत्रिम पाऊस?

'वालचंदनगर' आणि इस्रोचं नातं

‘वालचंदनगर इंडस्ट्री’ आणि इस्रोचं खास नातं आहे. इस्रोसाठी हा उद्योग 1973 पासून मोटार, बुस्टर आणि इतर उच्च क्षमतेच्या मशिन्स बनविण्याचं काम करतोय. इतर उद्योगांना लागणाऱ्या मशिन्स आणि अंतराळ मोहिमांसाठी लागणाऱ्या मशिन्स यात खूप मोठा फरक असतो. अंतराळ मोहिमांमध्ये अतिशय उच्च क्षमता आणि गुणवत्ता हवी असते. ते कठीण काम हा उद्योग गेली कित्येक दशकं करतोय.

‘ROHINI’, ‘SROSS’, ‘IRS’, ‘G-SAT यांच्यासह अनेक उपग्रहांसाठी ‘वालचंदनगर इंडस्ट्री’ने अनेक गोष्टी पुरवल्या होत्या. त्याचबरोबर Chandrayan I आणि Mangalyaan मोहिमेमध्येही ‘वालचंदनगर इंडस्ट्री’चा सहभाग होता. त्याचबरोबर अणुऊर्जा आणि लष्करासाठीही ‘वालचंदनगर इंडस्ट्री’ अनेक साहित्य पुरवत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 15, 2019 01:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...