'चांद्रयान 2'चं हे आहे बीड कनेक्शन, इथले शास्त्रज्ञ करतात NASAलाही मदत

चंद्रावरील खनिजासंदर्भातील माहितीवर होणारे संशोधन हे बीडमधील मिलिया महाविद्यालयात होणार आहे. यासाठी बीडच्या मिलिया महाविद्यालयात विशेष कॉम्प्युटर लॅब देखील तयार करण्यात आलीय.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 09:37 PM IST

'चांद्रयान 2'चं हे आहे बीड कनेक्शन, इथले शास्त्रज्ञ करतात NASAलाही मदत

बीड, सुरेश जाधव, 26 जुलै :  बीड जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या डॉ. सय्यद शफीयोद्दीन यांचं नाव सध्या चांगलंच चर्चेत आलंय. याचं कारणही तसंच आहे. चांद्रयान 2 ISROला जी माहिती पाठवणार आहे त्या माहितीचं विश्लेषण करण्याचं काम बीडचे हे शास्त्रज्ञ करणार आहेत.चंद्राच्या भूपृष्ठावरील खनिजांसंदर्भातील माहितीवर डॉ. शफीयोद्दीन संशोधन करणार आहेत त्यामुळे बीडच्या आणि मराठवाड्याच्या प्रतिष्ठेत मोठी भर पडलीय.

सावधान! विकेंडला घराबाहेर पडणे टाळा, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे..

डॉ. सय्यद शफीयोद्दीन हे बीडच्या मिलिया महाविद्यालयातले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संगणक शास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. शफियोद्दीन आणि त्यांची टीम चांद्रयान-2च्या माहितीवर संशोधन करणार आहे. यासाठी एका इस्रो कक्षाची स्थापनाही मिलिया महाविद्यालयात करण्यात आलीय. यापूर्वीच्या चांद्रयान-1 मोहिमेच्या माहितीचे विश्लेषणातही डॉ. सय्यद शफियोद्दीन यांचा सहभाग होता. तसेच ते नासा आणि इस्रोच्या एका संयुक्त प्रकल्पावर देखील काम करीत आहेत.

दृष्टिहीन मुलीवर जन्मदात्यानेच केला बलात्कार, पीडिता 2 महिन्यांची गरोदर

चंद्रावरील खनिजासंदर्भातील माहितीवर होणारे संशोधन हे बीडमधील मिलिया महाविद्यालयात होणार आहे. यासाठी बीडच्या मिलिया महाविद्यालयात विशेष कॉम्प्युटर लॅब देखील तयार करण्यात आलीय. चांद्रयान-2 मध्ये बीड जिल्ह्यातील भूमिपुत्र संशोधन करणार असल्याने  चांद्रयान-2  मोहिमेत बीड चे कनेक्शन समोर आलंय. यामध्ये इस्रोने लुनार सायन्स क्षेत्रात काम करणार्‍या देशभरातील 60 शास्त्रज्ञांना एकत्र केले. यात चांद्रयानाकडून मिळणार्‍या माहितीचे विश्लेषण करण्याची जबाबदारी या शास्त्रज्ञांच्या या पथकावर सोपवण्यात आलीय.

Loading...

मासे पकडण्याच्या वादातून धरणांमध्ये कालवलं जातंय विष, नागरिकांच्या जीवाशी खेळ

चांद्रयान-1 मोहिमेत चंद्रावर काही संयुगांच्या रूपात पाणी असल्याचा शोध लागलेला आहे. आता चंद्रावरील खनिजांची माहिती या मोहिमेतून घेण्यात येणार असून त्यातून देश आणि जगासाठीच महत्त्वाची माहिती मिळणार असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे. या मोहिमेतील मिनरल (खनिज) मॅपिंग करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

अखेर मुंबई काँग्रेसला मिळाला नवा कार्याध्यक्ष, काँग्रेसनं खेळला खास डाव

या प्रकल्पावर त्यांच्यासोबत झिशान शेख हे देखील रिसर्च फेलो म्हणून काम करत आहेत. 2015 पासून डॉ. सय्यद शफियोद्दीन हे इस्रोशी संबंधित आहेत. देशातील ज्या मोजक्या लोकांना हे काम करण्याची संधी मिळाली त्यापैकी एक असणारे डॉ. सय्यद शफियोद्दीन हे मुळचे पाटोद्याचे आहेत. शफियोद्दीन यांच्यामुळ महाविद्यालयाची मान उंचावली अशी प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.इलियास फाजील यांनी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2019 09:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...