चंद्रपूर, 27 मे : जिल्ह्यात मूल तालुक्यातील मारोडा राऊंड परिसरात अंत्यत कमजोर अवस्थेत बिबट्याचे पिल्लू आढळून आले. वादळी पावसामुळे हे पिल्लू भरकटलं होतं.
जिल्ह्यामधील मूल तालुक्यातील बफर क्षेत्रातील मारोडा राऊंड परिसरात अंत्यत कमजोर अवस्थेत बिबट्याचे पिल्लू आढळून आले. रात्री वादळी पाऊस आल्याने आईपासून तो भरकटला आणि त्यामुळे त्याला मानसिक हादरा बसला असावा, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली.
उसराळा या गावातील नदी लगत असलेल्या शेतात ४ ते ५ महिन्यांचे बिबट्याचे नर जातीचे पिल्लू अत्यंत कमजोर आणि भेदरलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळले. घटनेची माहिती मिळताच मारोडाचे वनरक्षक पाडदे यांनी घटनास्थळी येवून बिबट्यावर प्राथमिक औषधोपचार केले आणि पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात पाठवले. वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे आता बिबट्या सुखरूप आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा