शिक्षकीपेशाला काळीमा,विद्यार्थिनींशी मोबाईलवर करायचा अश्लिल संभाषण

खासगी शिकवणी वर्गात येणाऱ्या विद्यार्थिंनीशी अश्लिल संभाषण करणाऱ्या शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय

Sachin Salve | Updated On: Nov 23, 2017 09:42 PM IST

शिक्षकीपेशाला काळीमा,विद्यार्थिनींशी मोबाईलवर करायचा अश्लिल संभाषण

23 नोव्हेंबर : चंद्रपूर जिल्हयात शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी घटना घडलीये. खासगी शिकवणी वर्गात येणाऱ्या विद्यार्थिंनीशी अश्लिल संभाषण करणाऱ्या शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय तर आणखी दोन मुलीनींही शिक्षकाविरुद्ध तक्रार दिल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे.

नवरगाव येथील मनोज बोरकर हा शिक्षक घरीच खासगी शिकवणी घेत होता. या शिक्षकाने शिकवणी वर्गातल्या एका विद्यार्थिंनीसोबत मोबाईलवर सतत अश्लिल संभाषण केले होते. ती  आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पीडित विद्यार्थिनीच्या पालकासह शेकडो संतप्त नागरिकांनी शिक्षकाच्या विरोधात मोर्चा काढला.

त्यानंतर पोलिसांनी मनोज बोरकरच्या विरोधात आयटी एक्टसह इतर गंभीर गुन्हे दाखल केले. या शिक्षकाला अटक केल्यानंतर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करुन जबाब नोंदवला. मनोज बोरकरच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याच्या घराची तपासणी केल्यावर तीन पेन ड्राईव्हसह लॅपटाप आणि इतर साहित्य जप्त करुन न्यायवैद्यक प्रयोगशाळेत हे साहित्य पाठवण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2017 09:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close