S M L

अभ्यास केला नाही म्हणून विद्यार्थिनीचे मुळासकट केस उपटले, शिक्षिकेची ही कोणती शिक्षा ?

चंद्रपूरमध्ये एका शिक्षिकेनं शिक्षेच्या नावाखाली क्रूरतेचा कळस गाठलाय. अभ्यास केला नाही म्हणून या शिक्षिकेनं विद्यार्थिनीचे केस मुळापासून उपटलेत.

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2018 11:08 PM IST

अभ्यास केला नाही म्हणून विद्यार्थिनीचे मुळासकट केस उपटले, शिक्षिकेची ही कोणती शिक्षा ?

23 जानेवारी : चंद्रपूरमध्ये एका शिक्षिकेनं शिक्षेच्या नावाखाली क्रूरतेचा कळस गाठलाय. अभ्यास केला नाही म्हणून या शिक्षिकेनं विद्यार्थिनीचे केस मुळापासून उपटलेत. हा संतापजनक प्रकार उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडालीय.

निवेदिता ही चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठित माउंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कुल या शाळेतील केजी -2  अ मधील पहिल्या बेंचवरील हुशार विद्यार्थिनी. सोमवारी निवेदिता शाळा संपवून घरी आली. आईने तिचे अंघोळ घालून दिली. केस विंचरताना तिने आईचा हात धरला. असह्य वेदना होत असल्याची तक्रार केली. आईने निरीक्षण केले. तिला डोक्यावरील केस उपटलेले दिसले.

निवेदिताने वर्गशिक्षिका 'मलिका' हिने मारहाण केल्याचं सांगितलं. कुटुंबीयांनी शाळा गाठली. शाळेच्या मुख्याध्यापिकेसोबत चर्चा केली मात्र तिचे केस असेच होते असे उत्तर मिळालं. त्यानंतर वर्गातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तेव्हा खरा प्रकार उजेडात आला. फक्त बोर्डवरील अभ्यास लिहिला नसल्याचे कारण पुढे करत हा प्रकार झाल्याचं स्पष्ट झालंय. शाळा प्रशासनाने धडक कारवाई करत या शिक्षिकेची हकालपट्टी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2018 11:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close