S M L

लातूर, परभणी आणि चंद्रपुरात मतदान संपलं, आता 21 तारखेला फैसला जनतेचा !

सुधीर मुनंगटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज आहिर यांची प्रतिष्ठापणाला

Samruddha Bhambure | Updated On: Apr 19, 2017 08:06 PM IST

लातूर, परभणी आणि चंद्रपुरात मतदान संपलं, आता 21 तारखेला फैसला जनतेचा !

19 एप्रिल : लातूर, परभणी आणि चंद्रपूर या महापालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असून उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय.

परभणीत 5.30 वाजेपर्यंत 57 टक्के मतदान झालं. तर चंद्रपूरमध्ये 5.30 वाजेपर्यंत 43 टक्के मतदान झालंय. लातूरमध्ये 5.30 वाजेपर्यंत 42 टक्के मतदान झालंय. मात्र कडक उन्हामुळे तिन्ही ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी झाली.

लातुरात देशमुख तर चंद्रपुरात मुनगंटीवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तिन्ही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे वातावरणातील उष्णता लक्षात घेता मतदानाची वेळ एक तासानं वाढवली होती. लातूरची महानगरपालिका नेहमीच काँग्रेसच्या ताब्यात राहिल्यानं या निवडणुकीत देखील देशमुख घराण्यातल्या तिन्ही भावंडांनी जोमात प्रचार केलाय. तर चंद्रपूर महानगरपालिकेसाठी होणारी ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक 17 प्रभागातील  66 जागासाठी होतेय. सगळयाच पक्षांचे एकूण 460 उमेदवार रिंगणात आहेत. सरसंघचालक मोहन भागवतांसह राज्याचे अर्थमंञी सुधीर मुनगंटीवाराचं चंद्रपुर मुळगाव असल्याने भाजपसाठी राजकीयदृष्टया ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. तर परभणीत महापालिका निवडणुकीकडे सर्व पक्षांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे परभणीचा वाली कोण असा प्रश्न पडलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 07:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close