चंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया !

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2018 05:48 PM IST

चंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया !

चंद्रपूर, 20 आॅगस्ट :  चंद्रपूर जिल्हयातल्या भद्रावती नगरपरिषदेवर शिवसेनेनं पुन्हा भगवा फडकावलाय. शिवसेनेला बहुमत मिळाल्याने दहा वर्षांपासून असलेली सत्ता राखण्यात यशस्वी ठरलीये. भाजपचे नेते केंद्रीय गृहराज्यमंञी हंसराज अहीर यांनी प्रयत्नाची पराकाष्टा केली पण त्यांना त्यात यश आले नाही.

भद्रावती नगरपरिषदेसाठी रविवारी सार्वत्रिक निवडणूक झाली होती.  शिवसेनेची गेल्या दहा वर्षांपासून या नगरपालिकेत एकहाती सत्ता असल्याने वरोऱ्याचे शिवसेनेचे आमदार बाळु धानोरकर यांच्यासाठी ही सत्ता कायम राखण्याचं आव्हान होतं तर भाजपची सत्ता आणण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंञी हंसराज अहीर यांनी प्रयत्न केले होते माञ मतदारांनी परत एकदा तिसऱ्यांदा शिवसेनेच्या एकहाती सत्ता दिली.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाळु धानोरकरांचे बंधू असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल धानोरकर विजयी झाले असून त्यांनी आठ हजार मतांनी भाजपचे सुनिल नामोजवार यांचा पराभव केलाय. नगरसेवक पदाच्या 27 जागापैकी 16 जागा शिवसेनेनं तर चार जागा भाजपने जिंकल्या आहे काँग्रेसला दोन तर भारिप बहुजन महासंघाचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.

भद्रावती नगर पालिका निवडणूक निकाल

शिवसेना 16

भाजप 4

भारीप 4

काँग्रेस 2

अपक्ष 1

एकूण 27

अलीकडे झालेल्या जळगाव महापालिका आणि सांगली महापालिका निवडणुकीत शिवसेनाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. जळगावमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता राखली होती. सुरेष दादा जैन यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुरेश जैनांनी प्रथमच आघाडीचा सवतासुभा बाजुला ठेऊन शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुका लढल्या तरीही तरीही त्याचा त्यांना काहीच राजकीय फायदा झाला नाही. बरेच दिवस जेलमध्ये राहिल्याने त्यांना जळगावकरांची सहानुभूती मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. पण झालं उलटचं, गिरीश महाजनांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन प्रथमच महापालिकेची सत्ता काबीज केली.

अनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2018 05:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close