महेश तिवारी, चंद्रपूर
चंद्रपूर, 10 एप्रिल : जन्मदात्या आईनंच बाळ नकोसं झालं म्हणून काही तासाच्या बाळाला फाशी देवून मारण्याचा प्रयत्न केला. त्याला मरणाच्या दारात ढकलून दिलं. पण सुदैवानं बाळ वाचलंय. या प्रकरणी आरोपी आईला अटक करण्यात आलीये.
जिल्हयात भिसी इथं 9 जानेवारीच्या पहाटे ही माता शौचालय जवळच प्रसूती झाली तिथेच तिने बाळाचे नाळ कापले आणि त्या बाळाला मारण्यासाठी गळ्याला दोरीने बांधले मुलगा मरण पावला या हेतूने तीने तेथिलच गटारात एका पिशवीमध्ये टाकून पलायन केले.
प्रातविधीसाठी महिला जेव्हा गेल्या तेव्हा ही घटना त्यांना दिसून आली तिथे बघ्याची गर्दी जमा झाली आणि हा प्रकार समोर आला. स्थानिक पत्रकार पंकज मिश्रा यांना माहिती मिळताच त्यांनी लगेचच तिथं धाव घेतली. कल्पना दिघोरे या महिलेच्या मदतीनं त्यांनी या बाळाला वाचवलं आणि थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं. पण वेळेवर उपचार मिळाले आणि त्याचा जीव वाचला. पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेडीकल काॅलेज इथं हलवण्यात आलंय.
जन्मदात्या आईलाच हा चिमुकला जीव नकोसा झाला होता. पण भिसी गावतले अनेकजण या बाळाला आपलंसं करायला तयार होते. त्याला दत्तक घेण्याची तयारीही काहीजणांनी दाखवली. तीन किलो वजनाच्या या बाळाची प्रकृती आता चांगली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार या बाळाच्या आईच हे कृत्य केलंय. इतका निरागस जीव त्या मातेला का टाकून द्यावासा वाटला, ती इतकी निर्दयी का झाली असेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा