चंद्रपूर लोकसभा निवडणूक : भाजपचे हंसराज अहिर पाचव्यांदा उत्तीर्ण होणार का?

चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार हंसराज अहिर यांना रिंगणात उतरवलं आहे. हंसराज अहिर हे मोदी सरकारमध्ये गृहराज्यमंत्रीही होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे सुरेश धानोरकर निवडणूक लढवत आहेत. या लढतीमुळे हंसराज अहिर यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 12:59 PM IST

चंद्रपूर लोकसभा निवडणूक : भाजपचे हंसराज अहिर पाचव्यांदा उत्तीर्ण होणार का?

चंद्रपूर, 16 मे : चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार हंसराज अहिर यांना रिंगणात उतरवलं आहे. हंसराज अहिर हे मोदी सरकारमध्ये गृहराज्यमंत्रीही होते.

त्यांच्याविरोधात काँग्रेसचे सुरेश धानोरकर निवडणूक लढवत आहेत. या लढतीमुळे हंसराज अहिर यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

भाजपचा 15 वर्षं कब्जा

चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर गेली 15 वर्षं भाजपचा कब्जा आहे. याआधी हा काँग्रेसचा गड मानला जात होता. त्यामुळेच काँग्रेस पुन्हा एकदा ही जागा मिळवणार की भाजप आपली जागा राखणार हा खरा प्रश्न आहे. हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाखालीच भाजपने 1996 मध्ये चंद्रपूरची जागा मिळवली होती.

2014 च्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या तुलनेत चंद्रपूरमध्ये यावेळी कमी मतदान झालं. या मतदानाचा अर्थ काय आहे ते 23 मे ला कळेल.

Loading...

मागच्या निवडणुकीत भाजपचा विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांनी काँग्रेसच्या संजय देवतळेंचा पराभव केला होता. हंसराज अहिर यांना त्यावेळी 5 लाख 8 हजार 49 मतं मिळाली तर संजय देवतळे यांना 2 लाख 71 हजार 780 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. या निवडणुकीत आपचे वामनराव चटप यांनाही 2 लाख 4 हजार 413 मतं मिळाली.

11 एप्रिलला मतदान

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी हे विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये वरोरा शिवसेनेकडे आहे तर उरलेल्या जागांवर भाजपचं वर्चस्व आहे.

चंद्रपूरमध्ये मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. चंद्रपूरच्या मतदारांनी यावेळी भाजपला कौल दिला की इथे काँग्रेसला पुन्हा एकदा संधी दिली हे मात्र निकालाच्या दिवशीच कळणार आहे.

==========================================================================

VIDEO: पंतप्रधानपदाबाबत काँग्रेस बॅकफुटवर, काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...