मोठा गौप्यस्फोट, 'उमेदवारी कापण्यासाठी भाजपने केली 20 कोटींची उलाढाल'

माझी उमेदवारी कापण्यासाठी भाजपने एका दलालामार्फत २० कोटीची उलाढाल केल्याच खळबळजनक व्यक्तव्य कॉंग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी एका कार्यकर्त्या मेळाव्यात केले आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 06:49 AM IST

मोठा गौप्यस्फोट, 'उमेदवारी कापण्यासाठी भाजपने केली 20 कोटींची उलाढाल'

चंद्रपूर, 01 एप्रिल: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये चांगलच रणकंदन झाले होत. दोन उमेदवाराला डावलून राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर अखेर बाळू धानोरकर यांना उमेदवारी मिळाल्याचे सांगण्यात आले होते. आता मात्र माझी उमेदवारी कापण्यासाठी भाजपने एका दलालामार्फत २० कोटीची उलाढाल केल्याच खळबळजनक व्यक्तव्य कॉंग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी एका कार्यकर्त्या मेळाव्यात केले आहे.

वरोरा इथे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांच्या प्रचाराच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बाळू धानोरकर यांनी माझी उमेदवारी कापण्यासाठी भाजपकडून मोठी खेळी खेळण्यात आली होती. या सर्व प्रकारामध्ये जवळपास २० कोटी रुपयाचा व्यवहार झाला होता. तसेच चंद्रपुरात कमजोर उमेदवार देण्यासाठी एका दलालाला २० कोटी रुपयाची देणगी देण्यात आली. मात्र पक्षश्रेष्ठींचे विचार तसे नव्हते. असा जर पक्षश्रेष्ठींचा विचार असता तर एवढा मोठ पक्ष आतापर्यंत चालू नसता शकला, म्हणून पण दलालामार्फत दबाव आणून कमजोर उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली होती. मात्र कार्यकर्त्याच्या मागणीनुसार शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर मला उमेदवारी देण्यात आली .


VIDEO : विखे आणि थोरात एकत्र पण एकमेकांकडे पाहिलेही नाही


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 06:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...