भरचौकात प्रियकराला बदडलं, तरीही तो म्हणे,'मी तुझ्यासोबतच'...

चंद्रपुरात मुला-मुलीचा भरचौकात प्रेमाचा तमाशा, लग्नाला नकार देत असल्याचा मुलीचा आरोप

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2017 04:35 PM IST

भरचौकात प्रियकराला बदडलं, तरीही तो म्हणे,'मी तुझ्यासोबतच'...

03 एप्रिल :  आपण सैराट पाहिलाय... त्यात प्रेम आहे, मत्सर आहे, तिरस्कार आहे आणि दांभिक अभिमानही... शेवटी एका प्रसंगात तर परशा चक्क आर्चीच्या थोबाडीत लगावतो... त्यावेळेस फिल्म पहाता पहाता आपण अलगद प्रेमाच्या दुसऱ्या बाजुला जाऊन उभे ठाकतो. पण असाच काहीसा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात पाहायला मिळाला.

घरदार सोडून प्रियकराला सर्वस्व अर्पण केलं, तरीही तो लग्नासाठी मुली पाहत होता. ही बाब समजल्याने प्रेयसीने भरस्त्यात प्रियकराला चांगलंच बदडलं. प्रियकराला मारुन थकलेल्या प्रेयसीला भोवळ आल्याने शेवटी प्रियकरानेच तिला आधार दिला. भर चौकात मार खाऊनही 'मी तुझाच असल्याचा' प्रियकराने तिला विश्वास दिल्याने धुलाई पाहणारे चक्रावून गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2017 04:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...